Viral Video : पोलीस कर्मचाऱ्यावर शाब्बासकींचा पाऊस; व्हिडिओ पहाल तर तुम्ही देखील म्हणाल… | पुढारी

Viral Video : पोलीस कर्मचाऱ्यावर शाब्बासकींचा पाऊस; व्हिडिओ पहाल तर तुम्ही देखील म्हणाल...

पुढारी ऑनलाईन डेस्क : पावसाळा सुरू झाला की रस्ते पाण्याने तुडुंब भरलेले पहायला मिळतात. काहीवेळा ड्रेनेजमध्ये अडकलेला कचरा, रखडलेली नालेसफाई यामुळे रस्त्यांवर तुंबलेलं पाणी हे रस्ता बुजवून टाकतं. पण याचा त्रास नागरिकांना होत असतो. अशावेळी प्रशासनावर ओढलेले ताशेरे ओढण्याचं काम मात्र नक्की केलं जातं. पण एक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी यांनी अशा परिस्थितीत उल्लेखनीय काम केलं. ज्यामुळे त्याची सोशल मीडियावर युजर्संनी शाबासकी दिली. याची चांगलीच चर्चा होत आहे. (Viral Video)

पावसाळ्यात महानगरपालिकाचे कर्मचारी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत रस्ता पाणी आणि चिखलाने भरलेला असतो. बंगळुरूमध्ये अशा स्थितीमध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी महानगरपालिका कर्मचारी येण्याची वाट न पाहता ही समस्या सोडवली. या संबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये एक शासकीय कर्मचारी यांनी कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन उल्लेखनीय कामगिरी बजावली. हे कर्मचारी बंगळुरूच्या वाहतूक पोलीस खात्यात कार्यरत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये

वाहतूक पोलीस कर्मचारी जगदीश रेड्डी नेहमीप्रमाणे रस्त्यावर ड्युटी बजावत होते. पावसाळ्याच्या दिवसात सुरू झालेली रिमझिम ही अधिक तीव्र झाली. ज्यामुळे रस्ते पाण्याने भरलेले दिसू लागले. अशातच रेड्डी जिथे सेवा बजावत होते त्याठिकाणी ड्रेनेजमध्ये अडकलेल्या कचऱ्याने पाणी तुंबले. त्यामुळे वाहतुक व्यवस्था खोळंबली. या समस्येचे निराकरण करणे महानगरपालिकाच्या कार्यक्षेत्रात येते. पण कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रेड्डी यांनी स्वत:च नाल्यामध्ये हात घालून कचरा काढला. रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याला मोकळे केले. त्यांनतर वाहतुक व्यवस्था सुरळीत झाली. हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएस अधिकारींनी केले अभिनंदन

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “प्रशंसनीय कार्य, हे काम त्यांच्या नोकरीच्या कार्यकक्षेत येत नाही, तरीही त्यांची सेवाभावना आणि कर्तव्याची निष्ठा यातून दिसून येते.”

बंगळुरूचे वाहतूक अधिकारी जगदीश रेड्डी यांनी नाल्याच्या तोंडावर साचलेला कचरा आपल्या हाताने साफ केला जेणेकरून रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये. त्यांचे ट्विट अनेक यूजर्सनी रिट्विट केले आहे. यावर अनेक कमेंट्स आलेल्या पहायला मिळत आहेत. काही युजर्सनी म्हटले आहे की, खऱ्या नायकाला सलाम, तर कोणी ट्रॅफिक अधिकाऱ्याचे आभार मानले. एका यूजरने म्हटले आहे की, “त्यांच्याकडे बघून असे वाटते की आजही माणुसकी जिवंत आहे.”

हेही वाचा

Back to top button