महाराष्ट्रात केवळ ४ लाख ५६ हजार ३२३ लसी शिल्लक! | पुढारी

महाराष्ट्रात केवळ ४ लाख ५६ हजार ३२३ लसी शिल्लक!

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

मुबलक लसींचा साठा शिल्लक नसल्यामुळे महाराष्ट्र सरकारने येत्या १ मे पासून सुरू होणाऱ्या १८ वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण अभियान सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार महाराष्ट्रात केवळ ४ लाख ५६ हजार ३२३ लस शिल्लक आहेत. एका दिवसात तब्बल ५ लाखांचे लसीकरण करणाऱ्या महाराष्ट्रासाठी हा साठा अत्यंत तोकडा असल्याचे मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

अधिक वाचा : ‘सोशल मीडियातून वैद्यकीय मदत मागणाऱ्यांवर कारवाई केल्यास न्यायालयाचा अवमान समजला जाईल’!

​धक्कादायक बाब म्हणजे देशातील अनेक राज्यांमध्ये केंद्राकडून पुरवठा करण्यात आलेल्या लसी वाया गेल्याची माहिती समोर आली आहे. लक्षद्वीपमध्ये तब्बल ९.७ टक्के लसी वाया गेल्या आहेत. महाराष्ट्राला आतापर्यंत १ कोटी ६३ लाख ६२ हजार ४७० लसी उपलब्ध झाल्या. यातील १ कोटी ५९ लाख ६ हजार १४७ लशींचा महाराष्ट्रात उपयोग करण्यात आला. यातील काही लसी वाया गेल्याचे देखील मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तर, तामिळनाडूत सर्वाधिक ४,१६,८७६ लसींचा साठा शिल्लक आहे.

अधिक वाचा : ‘तर आरोग्यमंत्री राजीनामा देतील का?’

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी सकाळपर्यंत २.४५ कोटींहून अधिक नागरिकांनी कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे. २८ एप्रिल पासून ही नोंदणी सुरु झाली असून पहिल्या दिवशी १.३७ कोटी लोकांनी तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ एप्रिलला १.०४ कोटींपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली होती. लसीकरण अभियानातून आतापर्यंत १५,२२,४५,१७९ लसींचा डोस लाभार्थ्यांना देण्यात आला आहे.

यात, ९३,८६,९०४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि  ६१,९१,११८ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी १,२४,१९,९६५ जणांना पहिला डोस, तर ६७,०७,८६२ जणांनी दुसरी डोस घेतला आहे. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ५,१७,७८,८४२ लाभार्थ्यांना पहिला तर ३४,१७,९११ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ५,१९,०१,२१८ लाभार्थ्यांना पहिला तर  १,०४,४१,३५९ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील दहा राज्यांत एकूण ६७.०८% लसींचा डोस देण्यात आल्या.

कुठल्या राज्यात किती टक्के लसी गेल्या वाया 

राज्य            लसी शिल्लक 

१) उत्तर प्रदेश     १३,३६,६७७

२) बिहार             ७,२२,२३७

३) झारखंड           ६,१५,७१५

४) आसाम            ५,८३,७७८

५) गुजरात            ५,५७,७६४

६) दिल्ली              ४,८२,७९८

७) छत्तीसगढ         ४,६८,३२६

८) महाराष्ट्र            ४,५६,३२३

९) कर्नाटक           ४,३४,३३२

१०) तामिळनाडू      ४,१६,८७६

राज्यनिहाय लसीकरणासंबंधी आकडेवारी 
       राज्य     एकूण लसी       लसीकरण 

१) महाराष्ट्र    १,६३,६२,४७०  १,५९,०६,१४७

२) उ.प्रदेश    १,४१,४५,६७०  १,२८,०८,९९३

३) राजस्थान  १,३६,१२,३६०   १,३३,७०,१०२

४) गुजरात     १,३२,६९,३३०   १,२७,११,५६६

५) प.बंगाल    १,१३,८३,३४०   १,१०,४२,७४५

६) कर्नाटक    ९८,४७,९००    ९४,१३,५६८

७) बिहार        ७९,५०,९७०   ७२,२८,७३३

८) केरळ        ७३,२२,७९०    ७२,२९,२२९

९) तामिळनाडू  ६८,२८,९५०   ६४,१२,०७४

१०) आंध्रप्रदेश   ६५,३०,९२०    ६४,१४,९९५

Back to top button