राज्यांना आतापर्यंत देण्यात आले १७.४९ कोटी मोफत डोसेस | पुढारी

राज्यांना आतापर्यंत देण्यात आले १७.४९ कोटी मोफत डोसेस

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संकटावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबविली जात असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत केंद्र सरकारकडून राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना १७.४९ कोटी मोफत डोसेस देण्यात आले आहेत. राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असलेल्या डोसेसचे प्रमाण ८४ लाख इतके आहे.

केंद्राकडून आगामी तीन दिवसांत ५३ लाखांपेक्षा जास्त डोसेसचे वाटप सुद्धा केले जाणार असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली. केंद्र सरकारकडून राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना १७ कोटी ४९ लाख ५७ हजार ७७० डोसेसचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी १६ कोटी ६५ लाख ४९ हजार ५८३ डोसेसचा उपयोग करण्यात आला आहे. 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. कोविशील्‍ड आणि कोव्हॅक्‍सीन अशा दोन लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यास 1 मार्च रोजी तर तिसऱ्या टप्प्यास १ एप्रिलपासून सुरुवात झाली होती.

ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगाने नेमलेले अधिकारी हटविले; विश्वासू अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

गेल्या वर्षी पॅरोलवर सोडण्यात आलेल्या कैद्यांना आणखी ९० दिवसांची सूट!

राज्यातील कोरोना विरोधातील लढ्याचे पीएम मोदींकडून कौतुक!

 

Back to top button