‘देशातील १८० जिल्ह्यात आठवडाभरापासून कोरोनाचा एकही रूग्ण नाही’ | पुढारी

‘देशातील १८० जिल्ह्यात आठवडाभरापासून कोरोनाचा एकही रूग्ण नाही’

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशातील 180 जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून कोरोनाचा एकही रूग्ण आढळलेला नाही, अशी आशादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी दिली. याशिवाय गेल्या 14 दिवसांपासून 18 जिल्ह्यात एकही रूग्ण आढळला नसल्याचेही हर्षवर्धन यांनी नमूद केले. 

अनेक राज्यात कोरोनाचे संकट भीषण झाले आहे, मात्र त्याचवेळी असंख्य जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत आहे. गेल्या सात दिवसांत 180 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळलेला नाही तर 14 दिवसांत 18  जिल्ह्यामध्ये एकही रूग्ण आढळलेला नाही, असे सांगून हर्षवर्धन पुढे म्हणाले की, कोरोनाच्या या संकटकाळात विदेशातून मोठ्या प्रमाणात मदत प्राप्त होते. सर्व राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेशांना प्रभावी स्वरूपात या मदतीचे वाटप केले जात आहे. आतापर्यंत 2933 ऑक्सीजन कन्सनट्रेटर्स, 2429 ऑक्सिजन सिलेंडर्स, 13 ऑक्सीजन उत्पादन संयंत्र, 2951 व्हेंटिलेटर्स/बायपॅप/सीपीएपी मशीन्स तसेच तीन लाखांपेक्षा जास्त रेमडिसविर इंजेक्शनचे वितरण करण्यात आले आहे.

राज्यांना आतापर्यंत देण्यात आले १७.४९ कोटी मोफत डोसेस

ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगाने नेमलेले अधिकारी हटविले; विश्वासू अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

गेल्या वर्षी पॅरोलवर सोडण्यात आलेल्या कैद्यांना आणखी ९० दिवसांची सूट!

Back to top button