पुढील २० दिवसात ८ दिवस बँका बंद! | पुढारी

पुढील २० दिवसात ८ दिवस बँका बंद!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. मात्र, लॉकडाऊन काळात बँकांना शनिवार, रविवार आणि काही सणांच्या सुटया आहेत. त्यामुळे कामकाज आठ दिवस बंद राहणार आहे. ग्राहकांनी आपली कामे नेट बँकिगद्वारे करावीत असे आवाहन आरबीआयने केले आहे. देशात गेले सलग चार दिवस चार लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात वेगवेगळ्या तारखांना बँका बंद असल्याचे नमूद केले आहे. 

आरबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, १२ दिवस बँका बंद असणार आहेत. यामध्ये आठवड्याच्या सुट्ट्या देखील समाविष्ट आहेत. यापैकी काही सुट्ट्या झाल्या आहेत, तर अद्यापही आठ सुट्ट्या बाकी आहेत. अर्थात उर्वरित महिन्यात आणखी आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. काही सुट्ट्या काही ठराविक राज्यात असतात.

अशा असतील सुट्या

९ मे : रविवार

१३ मे : रमजान ईद (ईद-उल-फितर). (बेलापूर, जम्मू, कोचीन, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरममध्ये इ. ठिकाणी बँका बंद)

१४ मे : भगवान श्री परशुराम जयंती / रमजान ईद (ईद-उल-फितर) / बसवा जयंती / अक्षय तृतीया (बेलापूर, जम्मू, कोचीन, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)

१६ मे : रविवार 

२२ मे : चौथा शनिवार 

२३ मे : रविवार

२६  मे : बौद्ध पौर्णिमा. (आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद)

३० मे : रविवार 

Back to top button