हेमंत सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री | पुढारी

हेमंत सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री

गुवाहाटी:पुढारी ऑनलाईन 

आसाममध्ये भाजपने दुसऱ्यांदा सत्ता काबीज केल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स संपला आहे. प्रक्षोभक वक्तव्यांनी चर्चेत आलेले हेमंत बिस्वा सरमा यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. आसामचे प्रभारी आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सरमा यांच्या नावावर मोहर उमटवली आहे. पुन्हा संधी नसल्याने सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे राजीनामा सोपविलाआहे. 

वाचा : पंतप्रधान योग्य की तुम्ही? जयंत पाटलांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

आसाममध्ये मतदानाच्या शेवटच्या तीन दिवसांत सरमा यांना प्रक्षोभक भाषण केल्याने प्रचारावर बंदी घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी हेमंत बिस्वा सरमा आणि सर्वानंद सोनेवाल यांना दिल्लीला बोलविले होते. या दोघांशी वेगवेगळ्या चर्चा करण्यात आल्यानंतर एकत्र बैठक झाली.  त्यानंतर सरमा यांच्या नावाला पसंती दिल्याचे समोर आले आहे. सरमा यांनी निवडणुकीच्या तीन दिवस आधी विरोधी पक्षांना एनआयएवरून धमकी दिली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना प्रचारास बंदी घातली होती. 

वाचा : ‘पीएम मोदी, अमित शहांना बदलावे लागेल’

Back to top button