दिल्लीतील आजपासून मेट्रो सेवा बंद! लॉकडाउनला आठवड्याभराची मुदतवाद | पुढारी

दिल्लीतील आजपासून मेट्रो सेवा बंद! लॉकडाउनला आठवड्याभराची मुदतवाद

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

राजधानी दिल्लीत अद्यापही कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण तसेच महारोगराईचा प्रादुर्भाव म्हणावा तेवढा कमी झालेला नाही. याअनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेतून लॉकडाउनची मुदत वाढववित असल्याचे घोषित केले. 

अधिक वाचा : पुढील २० दिवसात ८ दिवस बँका बंद!

दिल्लीत आता १७ मे च्या पहाटे 5 वाजतापर्यंत लॉकडाउन राहिल.लॉकडाउन दरम्यान उद्या, सोमवारपासून दिल्लीची लाईफलाईन असलेली मेट्रो सेवा देखील बंद करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात २६ एप्रिल पासून कोरोनाबाधितांची संख्या रोडावली आहे. गेल्या एक ते दोन दिवसात दिल्लीतील कोरोना पॉझिटिव्हीटी दर ३५ वरून २३ टक्क्यांवर आला असल्याचे समाधान मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा : पंतप्रधान योग्य की तुम्ही? जयंत पाटलांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

लॉकडाउन दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी राहणार नाही. दरम्यानच्या काळात राज्यातील संसर्गाबाधितांच्या संख्येसंबंधी आढावा घेण्याचे निर्देश अधिकार्यांना देण्यात आले आहे. पुढेही स्थितीत सुधारणा झाली नाही, तर लॉकडाउनची मुदत वाढवली जावू शकते, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले. लॉकडाउनच्या काळात आरोग्य सुविधा तसेच विविध ठिकाणी ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात येईल. दिल्लीतील ऑक्सिजन स्थितीत सुधारणा झाली आहे. आता रूग्णालयांकडून एसओएस कॉल येणे बंद झाले असल्याचे केजरीवाल म्हणाले.

अधिक वाचा :  मराठा आरक्षण : कायदेतज्ज्ञांची समिती नेमणार

कोरोना महारोगराईचा वाढता प्रकोप लक्षात घेता राज्य सरकारने १९ एप्रिलला ६ दिवसांच्या लॉकडाउन घोषित केला होता. कोरोनास्थितीत सुधारणा न झाल्याने २५ एप्रिल पासुन पुन्हा आठवडाभर लॉकडाउन वाढवण्यात आला होता. पंरतु, ३ मे ला लॉकडाउनची मुदत संपण्यापूर्वीच १ मे ला आठवड्यांभरांचा लॉकडाउन लावण्यात आला. रविवारी पुन्हा १७ मे पर्यंत लॉकडाउन जाहिर करण्यात आला आहे.

अधिक वाचा : कोरोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत संपणार; तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये 

शनिवारी राजधानीत २२ दिवसांनंतर १८ हजारांहून कमी कोरोनारूग्ण आढळले. गेल्या ५ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या वाढिचा आलेख घसरला आहे. राज्यातील आरोग्य विभागानूसार ​राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख १० हजार २३१ पर्यंत पोहचली आहे. यातील १२ लाख ३ हजार २५३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, १९ हजार ७१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनामृत्यूदर १.४६ टक्के असून ८७ हजार ९०७ सक्रिय कोरोनारूग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत ५१ हजार ३३८ रेड झोन आहेत.

Back to top button