ममता दीदींच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी, नवीन चेहरे घेणार मंत्रिपदाची शपथ | पुढारी

ममता दीदींच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी, नवीन चेहरे घेणार मंत्रिपदाची शपथ

कोलकाता : पुढारी ऑनलाईन

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरश: धुव्वा उडवला. त्यानंतर बॅनर्जी यांनी ५ मे ला मुख्यमंत्रिपदी तिसऱ्यांदा शपथ घेतली. यानंतर त्यांच्या मंत्रिमडळाचा शपथविधी केव्हा होणार? यात कोण कोण असणार? याची चर्चा रंगली होती. आता याची प्रतिक्षा संपली असून आज सोमवारी त्या आपल्या मंत्रिमडळाचा शपथविधी करणार आहेत. त्यात एकूण ४३ सदस्य मंत्री म्हणून शपथ घेणार असून यात ९ राज्यमंत्री असतील. 

अधिक वाचा : सीएम ममतांकडून पोलिस खात्याची झाडाझडती!

ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळाला सुरूवात करणार असून त्यांच्या या मंत्रिडळात २५ जुने आणि १८ नवीन चेहरे असतील. तसेच या ४३ पैकी ९ राज्यमंत्री असतील. अमित मित्रा हे अस्वस्थ असून आणि ब्रात्या बोस यांना कोरोनाची लागण झाल्याने हे दोन मंत्री व्हर्च्युअल शपथ घेतील. विशेष बाब म्हणजे सुब्रत मुखर्जी, पार्थ चटर्जी, फरहाद हकीम, अरुप विश्वास, सुजित बोस, चंद्रिमा भट्टाचार्य आणि शशी पंजा पुन्हा मंत्री होणार आहेत.

अधिक वाचा : तुम्ही आत्तापर्यंत ऑक्सिजन आणि इतर सुविधांसाठी पथके का पाठवली नाहीत? सीएम ममता भडकल्या

मानस भुयान हे राज्यसभेचे खासदार होते आणि यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुक लढविली आणि निवडून आले. त्यामुळे तेही मंत्रिमंडळात असतील. पूर्व मिदनापूरचे अखिल गिरी आणि हावडाचे अरुप रॉय यांनाही संधी मिळणार आहे. तर संथाली सिनेमाचा स्टार बीरबहा हंसदा पहिल्यांदाच राज्यमंत्री होणार आहेत. या यादीत माजी आयपीएस अधिकारी हुमायूं कबीर यांचे नावही आहे.

अधिक वाचा : दिल्लीतून बंगालमध्ये येणाऱ्या मंत्र्यांना कोरोना अहवाल निगेटिव्ह दाखवावा लागणार : ममता बॅनर्जी

शपथविधी हा सकाळी १०.४५ ला राजभवनात होईल. राज्यपाल जगदीप धनकर यांनी याआधीच नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणातील चार जणांच्या सीबीआय खटल्याला मान्यता दिली असून त्यापैकी सुब्रत मुखर्जी आणि फरहाद हकीम हे आहेत. ते दोघेही आज मंत्रिपदाची शपथ घेतील. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींमध्ये मदन मित्रा आणि सोवन चटर्जी आहेत. मित्रा यांनी सुद्धा विधानसभा निवडणुक लढविली आणि आता ते आमदार आहेत. तर गतवर्षी चॅटर्जी यांनी तृणमूल सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपलाही सोड चिठ्ठी दिली. 

अधिक वाचा : ‘हिंसाचार रोखण्यासाठी काय उपाय केले?’

दरम्यान राज्यात निवडणुकांनंतर हिंसाचार उफाळला आहे. यावरून राज्यपाल आणि ममता बॅनर्जी यांच्यात ५ मे पासून वाद सुरू आहे. यावेळी राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना या हिंसाचारासाठी जबाबदार धरले असून ममता म्हणाल्या की, हिंसाचाराचे बरेच अहवाल हे बनावट होते. तसेच ज्यावेळी राज्यात हिंसाचार उफाळला त्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे होती. 

Back to top button