कोरोनातून मुक्त झाल्यानंतर फेकून द्या जुना टूथब्रश! | पुढारी

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर फेकून द्या जुना टूथब्रश!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जर तुम्ही कोरोनातून मुक्त झाला असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. अनेक लोकांनी सुरक्षिततेसाठी तुम्हाला सल्ला दिला असेल पण, कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की, कोरोनातून मुक्त झाल्यानंतर तुम्हाला टूथब्रश बदलायला हवं? ऐकून थोडं विचित्र वाटेल. पण, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. 

वाचा – कोरोना लसीकरणासाठी नोंद करणाऱ्या कोविन ॲपमध्ये मोठा बदल!

भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की, एकदा बाधित झाल्यानंतर हा विषाणू व्यक्तीला पुन्हा संक्रमित करू शकतो. सध्या लसीकरण हा उपाय प्रभावी ठरत आहे. परंतु, तज्ज्ञांचे मानणे आहे की, ते याची शंभर टक्के सुरक्षेची गॅरंटी देऊ शकत नाहीत. त्यामुळे कोव्हिड-१९ मधून मुक्त झाल्य़ानंतरही खूप काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

किती दिवसानंतर बदलावे टूथब्रश?

लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे डेंटल सर्जरीचे एचओडी डॉ. प्रवीण मेहरा म्हणतात की, एक व्यक्ती जो नुकताच कोव्हिड-१९ मधून रिकव्हर झाला आहे, त्याला आपला जुना टुथब्रश बदलून नवा टूथब्रशचा वापर करायला हवा. त्यामुळे संक्रमणाची शक्यता कमी होईल. शिवाय, घरातील सदस्यांनाही संक्रमणाचा धोका राहणार नाही, जे एकचं वॉशरूम वापरतात. 

आकाश हेल्थकेअर सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या कसल्टंट डॉ. भूमिका मदान यांनी या माहितीशी सहमती दर्शवली. सर्दी, खोकला आणि फ्लूमधून बाहेर पडलेल्या व्यक्तींना टूथब्रश बदलल्यामुळे खूप फायदा होईल. जर आपणास कोविड-१९ झाला असेल, तर लक्षणे दिसल्यानंतर २० दिवसांनंतर टूथब्रश आणि टंग क्लीनर बदलायलं हवं. 

​ओरल हायजीन 

डॉ. मदान म्हणतात, टूथब्रशवर जीवाणू तयार झाल्यामुळे अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होते. हे रोखण्यासाठी अनेक लोक गार्गलचा वापर करतात. तोंडातील विषाणूंना कमी करण्यास हे गॉर्गल मदत करते. जर माउथवॉश उपलब्ध नाही तर गरम पाण्याने गुळण्या करा. त्याशिवाय दिवसांतून दोन वेळा ओरल हाइजीन राहा आणि ब्रश करा. 

काय म्हणते विज्ञान?

कोविड-१९ मधून मुक्त झाल्यावर मौखिक स्वच्छता, टूथब्रश आणि जीभेच्या स्वच्छतेचे महत्व समजणे खूप महत्त्वाचे आहे. डब्ल्यूएचओनुसार, कोरोना बाधित व्यक्ती शिंकल्याने, खोकल्याने तोंडातून निघणाऱ्या विषाणूंद्वारे पसरतो. हे विषाणू हवेत सापडतो. त्यामुळे एकदा संक्रमित व्यक्तीच्य़ा शरीराबाहेर विषाणू बाहेर पडल्यानंतर तो हवेत पसरतो आणि दुसऱ्यांना संक्रमित करतो. त्यामुळे आपला जुना टूथब्रश फेका आणि नव्या टूथब्रशचा वापर करा. 

Back to top button