कवीने भाजपच्या पराभवाचा व्हिडिओ शेअर केला अन् फेसबुकने घातली २४ तासांची बंदी! | पुढारी

कवीने भाजपच्या पराभवाचा व्हिडिओ शेअर केला अन् फेसबुकने घातली २४ तासांची बंदी!

तिरुवनंतपुरम : पुढारी ऑनलाईन

केरळमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर तेथे अनेक उपहासात्मक व्हीडिओ आणि पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यामध्ये एका कवीने भारतीय जनता पार्टीच्या पराभवाचा उपहासात्मक व्हीडिओ फेसबुकवर पोस्ट केला. यावर फेसबुकने कडक पावले उचलताना कवीवर २४ तासांची बंदी घातली. के. सच्चिदानंदन असे त्या कवीचे नाव आहे. 

या बंदीच्या प्रकरणावर बोलताना भाजपने म्हटले आहे की, या सर्व प्रकारात आपली कोणतीही भूमिका नाही. विशेष बाब म्हणजे तो व्हीडिओ सच्चिदानंदन यांनी तयार केलेला नसून तो एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये आला होता. जो त्यांनी उचलला आणि फेसबुकवर पोस्ट केला.

अधिक वाचा : व्हॅक्सिन पॉलिसीमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज नाही! केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र 

यावर कवी सच्चिदानंदन यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, तो व्हिडिओ हा एका चित्रपटातील क्लिपिंग असून त्यात हिटलर हा आपल्या पराभवानंतर सैनिकांना उद्देशून बोलत आहे.या क्लिपमधील मूळ संभाषण उडाले असून त्याच्या जागी मल्याळमध्ये नरेंद्र मोदी आणि शहा यांना बोलताना दाखविले आहे. सच्चिदानंद म्हणतात की ती एक उपहासात्मक पोस्ट होती. ती नक्कीच भाजपच्या विरोधात होती. मात्र त्यात कोणावरही अश्लील आणि अभद्र वर्तन नाही.

अधिक वाचा : उत्तर प्रदेशातील कोरोना परिस्थिती चिघळली आहे : केंद्रीय मंत्री संतोष गंगवार 

दरम्यान ही घटना एका महिनाभरापूर्वीच घडली. त्यानंतर फेसबुकने त्यांना याबाबत इशारा ही दिला होता. मात्र यानंतर ही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती, असे सच्चिदानंद म्हणतात. तसेच केंद्र सरकार आणि फेसबुक यांच्यात काहीतरी साठंलोटं आहे. भारत हा एक मोठा ग्राहक देश असून भाजपचा आयटी सेल ही खूप मोठा आहे. जो आपल्या सारख्या लोकांवर लक्ष ठेवत असावा, जे समाजावर प्रभाव पाडण्यास सक्षम आहेत. सच्चिदानंदन यांच्या दृष्टीने, असे करणे हे, बोलण्याच्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याशिवाय काहीही नाही. आम्हाला सोशल मिडियावर आमचा राग व्यक्त करण्याची सुट मिळावी. ही तर हुकूमशही आहे. 

अधिक वाचा : कोरोनातून मुक्त झाल्यानंतर फेकून द्या जुना टूथब्रश!

यावर, मल्याळम कवी काहीही म्हणतील, पण त्या कवींची पोस्ट हटविण्यात पक्षाचा हात नाही, असे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. असे का केले आणि कशासाठी केले हे फक्त फेसबुकच सांगू शकेल असेही भाजपने म्हटले आहे. 

Back to top button