दिल्ली दंगलीतील आरोपी नताशा नरवालला जामीन | पुढारी

दिल्ली दंगलीतील आरोपी नताशा नरवालला जामीन

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

गतवर्षी दिल्लीत झालेल्या जातीय दंगल प्रकरणातील आरोपी नताशा नरवाल हिला दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन दिला. नरवाल हिच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर पिंजरा तोड समुहाचे काम पाहणाऱ्या व जेएनयुमध्ये असलेल्या नताशाला जामीन देण्यात आला आहे. 

सीएए व एनआरसी कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दिल्लीत प्रचंड जातीय हिंसाचार घडविण्यात आला होता. प्रामुख्याने ईशान्य दिल्लीला दंगलीची मोठी झळ बसली होती. दंगल भडकविण्यात पिंजरा तोड समुहाने मोठी भूमिका बजावल्याचे नंतर तपासात स्पष्ट झाले होते. नताशा नरवालसह इतर आरोपींना यासंदर्भात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नताशाच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर तिला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्याचा आदेश न्यायमूर्ती सिध्दार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती ए. जे. भंभानी यांनी दिला. तीन आठवड्यासाठी हा जामीन देण्यात आला आहे. 

Back to top button