रक्षकच झाला भक्षक! पोलिस अधिकाऱ्याकडून विधवा महिलेवर बलात्काराचा प्रयत्न | पुढारी

रक्षकच झाला भक्षक! पोलिस अधिकाऱ्याकडून विधवा महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

नवी दिल्ली ः पुढारी ऑनलाईन 

विझ बठिंडाच्या सीआयए स्टाफमध्ये तैनात असलेल्या असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर गुरविंदर सिंगने विधवा महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे गावकऱ्यांनी मिळून रंगेहात पडकडून पोलिसांच्या ताब्यात चांगलाच धडा शिकविला. 

वाचा ः महाराष्ट्रात प्रवेशासाठी कोरोना चाचणी सक्तीची

विधवा महिलेवर बलात्कार करण्याच्या तयारीत असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला गावकऱ्यांनी रंगेहात पकडल आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर पोलिस विभागानं त्याला तातडीनं नोकरीवरून काढून टाकले. पोलिस कोठडीत असताना त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली. 

वाचा ः मुख्यमंत्री – राष्ट्रवादीत नाराजीनाट्य !

समोर आलेली माहिती अशी की, गुरविंदर सिंगने अफू तस्कारीच्या खोट्या गुन्हा विधवा महिलेच्या २० वर्षांच्या मुलाला अटक केली होती. कोरोनाची लक्षणं असल्यामुळे तो घरात विलगीकरणात होता. तरीही पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. मुलाला सोडण्यासाठी गुरविंदरसिंगने महिलेकडे २ लाखांची मागणी केली. इतकंच नाहीतर हा पोलिस अधिकारी विधवा महिलेच्या थेट घरात शिरून मुलाच्या उपचारासाठी ठेवलेले ६० हजार रुपये काढून घेतले. 

वाचा ः रशियाने कोरोना लस शोधण्यात जगाला टाकले मागे

मुलाला सोडायचं असेल तर, आणखी २ लाखांची व्यवस्था करण्यास सांगितलं. संबंधित महिलेनं नातेवाईकांकडून १ लाख रुपयांपर्यंत जुळणा केली आणि गुरविंदर सिंगला दिले. मात्र, तरीही त्याने मुलाला सोडलं नाहीच, तर पुढे जाऊन त्याने संबंधित महिलेला शरीरसुखाची मागणी केली. हा सगळा प्रकार महिलेनं गावकऱ्यांना सांगितला. गावकऱ्यांनी एकत्र येऊन गुरविंदर सिंगला रंगेहात पकडण्याचं नियोजन केलं. संबंधित पोलिसांचा पर्दाफाश करण्यात यावा, यासाठी गावकऱ्यांनी महिलेच्या घरात छुपा कॅमेरा बसवला. 

वाचा ः ग्रामीण महाराष्ट्रात ७०% नवे रुग्ण !

मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महिलेच्या बोलविण्यावरून गुरविंदर सिंग विधवा महिलेच्या घरात आला. कपडे काढून विधवा महिलेशी शरीरसंबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असताना गावकऱ्यांनी त्याला रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

Back to top button