‘फ्री फायर गेम’च्या टास्कप्रमाणे मित्राची मान मोडून हत्या | पुढारी

'फ्री फायर गेम'च्या टास्कप्रमाणे मित्राची मान मोडून हत्या

रतलाम : पुढारी ऑनलाईन

लहान मुलांच्या हातात सहज स्मार्ट फोन उपलब्ध झाल्यामुळे मोबाईलमधील विविध गेमची सवय त्यांना झालेली आहे. आतापर्यंत मोबईलमधील गेम्समुळे अनेक मुलांचे प्राण गेलेले आहेत. तसेच मुलांमध्ये हिंसक वृत्तीही वाढलेली आहे. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील रतलाममध्ये घडलेली आहे. गेम खेळण्याचा बहाणा करत मित्रांनी एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याचं समोर आलं आहे. 

वाचा ः कोरोना : केंद्राच्या कोरोना हाताळणीवर प्रश्नचिन्ह; ‘या’ प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञाने दिला राजीनामा

पोलिसांकडून समोर आलेली माहिती अशी की, रतलामच्या शेजारील दयालपुरा गावात ही धक्कादायक घटना घडली. विशाल सिंह असं मृत मुलालं नाव असून त्याचं वय १५ वर्षे आहे. आरोपी उल्फत सिंग (वय-१८) आणि आणखी एक १६ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या तिघा मित्रांना मोबाईल खेळण्याची सवय होती. विशालने आरोपींबद्दल त्यांच्या घरात तबांखू, सिगारेटचं व्यसन आणि मुलीची संबंध असल्याचं सांगितले होता. त्याचा राग मनात ठेवून उल्फतने त्याचा काटा काढायचा ठरवला होता. 

वाचा ः चक्रीवादळाचा कोळीवाड्यांना धोका!

ठरल्याप्रमाणे आरोपी उल्फत आणि त्याचा मित्र यांनी विशालला गावाबाहेर मोबाईल गेम खेळण्यासाठी बोलावले. आपल्या गाडीवरून विशालला गावाबाहेर आणलं आणि मोबाईलमध्ये एखादा टास्क देतात, तसा अगोदरच खड्डा खनून ठेवला होता. टास्कप्रमाणे आरोपींनी विशालची मान फिरवली. त्यात त्याच्या मानेचं हाड मोडलं आणि मृत्यू झाला. मृत झाल्यानंतर त्याचा मृतदेह खड्ड्यात गाडला.

वाचा ः सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटले : मृत्यू वाढले

विशालच्या वडिलांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी गावातील लोकांची चौकशी केली असता, गावकऱ्यांनी उल्फातच्या गाडीवरून गावाबाहेर तिघे जण गेल्याचे समजले. पोलिसांनी उल्फत आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवला. त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कोर्टात दोघांनी शिक्षा झाली. एकाला तुरुंगात तर, दुसऱ्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले. 

Back to top button