देशात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला | पुढारी

देशात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कोरोना रुग्णांमध्ये दैनंदिन वाढ होताना दिसत आहे. ७ मे नंतर कोरोनाच्या दैनिक संक्रमणांमध्ये एक लाखाहून अधिक संख्या कमी आली आहे, या प्रकारे सक्रिय प्रकरणामध्ये रोज एक लाखाहून घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार, रविवारी कोरोनाचे ३ लाख ११ हजार १७० नवे केसेस समोर आले आहेत. सर्वात अधिक केसेस ७ मे रोजी आले होते. तेव्हा हा आकडा ४ लाख १४ हजार ९१५ होता. या सध्या या ९ दिवसांत १ लाख ३ हजार ७४५ इतकी घट झाली आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी दर १६ टक्क्यांखाली आहे. खूप कमी वेळेत ही घट झाली आहे. 

सकारात्मक बाब म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही गतीने वाढत आहे. मागील सहा दिवसांतील पाच दिवस असे होते की, नवे बाधित रुग्णांपेक्षा ठिक होणारे रुग्ण अधिक होते.  काल रविवार दि. १७ रोजी रेकॉर्ड  ५,५३, ३४४ सक्रीय रुग्णांमध्ये घट झाली आहे. १० मे रोजी देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३ कोटी, ७४ लाख ५ हजार २३७ होती. ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे. परंतु, १६ मे रोजी सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन ३ कोटी ६१ लाख ८ हजार  ४५८ झाली आहे. 

१० राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांमध्ये घट

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोनाने सर्वाधिक प्रभावित १० राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांमध्ये गतीने घट होत आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, छत्तीसगढ, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड तसेच हरियाणाचा समावेश आहे. 

आठ राज्यात चिंता

परंतु ८ राज्यांमध्ये सक्रिय रुग्ण गतीने वाढत आहेत. यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, आसाम, ओडिशा, त्रिपुरा तसेच उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. 

रोज कोरोना संक्रमणात अशी झाली घट :

२० एप्रिल : २,९४,३७८

२३ एप्रिल : ३,४५,२९६

२६ एप्रिल : ३,१९,४७१

२९ एप्रिल : ३,८६,७७३

०२ मे : ३,७०,०९०

० ५ मे : ४,१२,६२४

०८ मे : ४,०३,८०८

११ मे : ३,४८,५५५

१४ मे : ३,२६,२५६

१५ मे : ३,११,१७० 

Back to top button