“आपण मोदींच्या वैज्ञानिक समजाची किंमत चुकवत आहोत” | पुढारी

"आपण मोदींच्या वैज्ञानिक समजाची किंमत चुकवत आहोत"

नवी दिल्ली ः पुढारी ऑनलाईन 

देशातील प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमाल यांनी सल्लागार समुहाचा राजीनामा दिला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एमआईएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदींवर आरोप करता म्हंटलं आहे की, “INSACOG ने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान कार्यालयाला खतरनाक इंडियन म्युटेन्टबद्दल कल्पना दिली होती. परंतु, सरकारने त्याच्याकडे दूर्लक्ष केले”, असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला आहे. 

वाचा ः रत्नागिरी जिल्ह्याला ताउक्ते चक्रीवादळाने झोडपले; शासकीय रुग्णालयातही पाणी तुंबले

INSACOG ही संस्था कोरोनाच्या विविध म्युटेन्टंचा शोध घेण्यासा गठीत करण्यात आली होती. या संस्थेचे केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम होते. या संस्थेचे अध्यक्ष शाहिद जमील हे होते. त्यांनी मोदींच्या कोरोना हाताळणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. यावरूनच असदुद्दीन ओवेसी ट्वीट करत म्हणाले की, “INSACOG चे अध्यक्ष असणाऱ्या शाहिद जमील यांनी राजीनामा दिलेला आहे. INSACOG ने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान कार्यालयाला खतरनाक इंडियन म्युटेन्टबद्दल कल्पना दिली होती. परंतु, सरकारने त्याच्याकडे दूर्लक्ष केले. जमील यांनी स्वतः सांगितले की, मोदींना या संस्थेतील वैज्ञानिकांच्या दिलेल्या सल्लाकडे आणि माहितीकडे सरळ दूर्लक्ष केले. त्यामुळे आपण मोदींच्या वैज्ञानिक समजाची किंमत चुकवत आहोत”, असे ट्विट करत ओवेसी यांनी मोदी सरकारवर निषाणा साधला. 

वाचा ः ‘फायझर’ची कोरोना लसीच्या नफ्याची निती लोकांच्या जीवांशी खेळतीय

मार्च महिन्यात कोरोनाचे नवे व्हैरिएंट्सचे संक्रमण वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यातून कोरोना महामारीचा वेग जास्त होईल. कोरोना विषाणुंचा व्हेरिएंट B.1.617ला दुसरी लाट येण्याला कारणीभूत ठरेल, असं शाहिद जमाल यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. परंतु, सरकारने त्याच्याकडे सरळ-सरळ दुर्लक्ष केले. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर आणि देश त्याच्या दोन हात करत असताना, रोज ४ हजार लोकांचा मृत्यू होत असताना, कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाखांवर गेलेला असताना विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमाल यांनी आपला राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारचे कोरोना महामारीशी लढण्याची पद्धत चुकीची आहे, असे आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. पहिल्यांदाच केंद्राला सल्ला देणाऱ्या शास्त्रज्ञांच्या फोरममधील एखाद्या शास्त्रज्ञाने वेगळे मत मांडले. फोरमकडून योग्य सल्ला दिला असतानाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं, असं मत त्यांनी मांडलं आहे.

Back to top button