कोण पाय धरतो तर कोणी अभिवादन करतो! बाबा रामदेवांचा मंत्र्यांमधील ‘रुबाब’च वेगळा (photos) | पुढारी

कोण पाय धरतो तर कोणी अभिवादन करतो! बाबा रामदेवांचा मंत्र्यांमधील 'रुबाब'च वेगळा (photos)

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन ; पंतजली आयुर्वेदचे मुख्य बाबा रामदेव आणि IMA यांच्यातील वाद काही थांबायचे नाव घेत नाही. अॅलोपॅथिक डॉक्टरांकडून रामदेव बाबांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर १ हजार कोटींची मानहानी नोटीसही धाडण्यात आली आहे.  याचबरोबर IMA ने पीएम मोदींना पत्र लिहून बाबा रामदेव यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती.

IMA आणि बाबा रामदेव यांच्या वादात रामदेव बाबांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. यामध्ये रामदेव बाबा म्हणाले की मला कोणाचा बापही अटक करू शकत नाही. बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यावरून पीएम नरेंद्र मोदी आणि केंद्रातील दिग्गज नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. बाबा रामदेव सत्तेत असणाऱ्या नेत्यांच्या जवळीकतेमुळे ही भाषा वापरत आहेत अशी चर्चा सोशल मिडियावर जोरदार सुरू आहे.

रामदेव बाबा यांचे पंतप्रधान मोदींशी असलेले नाते किती दृढ आहे हे त्यांच्या फोटोवरून दिसते. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबा रामदेव यांच्या पाय धरत त्यांचा आशिर्वाद घेतल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि बाबा रामदेव यांचे घरगुती संबंध असल्याची चर्चा रंगत आहे. 

केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी आणि बाबा रामदेव यांचेही नाते मैत्री पुर्ण आहे.

केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद हे तर बाबा रामदेव यांच्या कोरोनील या औषधाच्या उद्घाटनाला गेले होते.

देशाचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची गळा भेट घेतलेले फोटो व्हायरल होत आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बाबा रामदेव यांचे मैत्रीपुर्ण नाते असल्याचे त्यांच्या भेटीवरून दिसून येत आहे.

माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरही याला अपवाद नाहीत.

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना भाजपकडून उमेदवारी बाबा रामदेव यांनीच मिळवुन दिली होती. मंत्री बाबुल यांनी याची माहिती दिली होती.

Back to top button