फाइव्ह स्टार हॉटेल्सचे व्हॅक्सिनेशन पॅकेज; केंद्राचा कारवाईचा इशारा  | पुढारी

फाइव्ह स्टार हॉटेल्सचे व्हॅक्सिनेशन पॅकेज; केंद्राचा कारवाईचा इशारा 

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन; एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना लस मिळण्यास अनंत अडचणी  येत असताना फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये व्हॅक्सिनेशन पॅकेज दिले आहेत. मात्र, ही कृती लसीकरण मोहिमेच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आहे, असे सांगत केंद्र सरकारने कारवाईचा इशारा दिला आहे. 

वाचा : अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनाने निधन 

सरकारी कार्यक्रमानुसार कोविड १९ लसीकरण केवळ सरकारी केंद्र आणि खासगी हॉस्पिटलमधील केंद्रांवर, सरकारी कार्यालयात होऊ शकते. वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांच्या घरापासून जवळच्या केंद्रावर लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, काही फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये लसीकरण सुरू आहे. हे लसीकरण नियमांविरोधात आहे. हा प्रकार तातडीने रोखला पाहिजे, असे निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

वाचा : चिंधीगिरी! ‘या’ अभिनेत्रीने कोविड योद्धा असल्याचे फेक ओळखपत्र दाखवून घेतली लस

आरोग्य मंत्रालयाने आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करून याबाबत इशारा दिला आहे. ‘सरकारी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर योग्यशीर कायदेशीर कारवाई करा. हॉटेलकडून व्हॅक्सिनेशन पॅकेज देऊन लोकांना आकर्षित करणे हे  नियमांचे उल्लंघन आहे. काही हॉस्पिटलच्या मदतीने हॉटेल्स अशा ऑफर देत आहेत, ते दुर्दैवी आहे. राज्य सरकारने अशा लोकांवर कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, अशाप्रकारे ऑफर देणे दुर्दैवी आहे. हॉटेलमध्ये लसीकरण अभियान हे नियमांविरुद्ध आहे. अशा हॉटेल मालकांवर कारवाई केली जाणार आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयांने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहून जे कोणी हा प्रकार करत असतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

वाचा : तामिळी अभिनेत्रीवर अत्याचार; माजी मंत्र्याने करायला लावला तीनवेळा गर्भपात

Back to top button