अमीरचा ‘तो’ व्‍हिडिओ रामदेव बाबांनी केला शेअर  | पुढारी

अमीरचा 'तो' व्‍हिडिओ रामदेव बाबांनी केला शेअर 

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन: योगगुरु रामदेव बाबांकडून ॲलोपॅथी उपचार पद्‍धतीविरोधातील धार आणखी तीव्र केली आहे. त्‍यांनी बॉलीवूड स्‍टार अमीर खानचा एक जूना व्‍हिडिओ शेअर करत पुन्‍हा एकदा ॲलोपॅथीला टार्गेट केले आहे. आता यावर ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (आयएमए) त्‍यांना कोणते उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अधिक वाचा : कोण पाय धरतो तर कोणी अभिवादन करतो! बाबा रामदेवांचा मंत्र्यांमधील ‘रुबाब’च वेगळा (photos)

आता रामदेव बाबांनी शेअर केलेला व्‍हिडिओ हा अभिनेता  अमीर खानच्‍या सत्‍यमेव जयते या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा आहे. या कार्यक्रमात जेनेरिक औषधांच्‍या किंमती आणि बाजारात उपलब्‍ध असणार्‍या विविध कंपन्‍यांच्‍या औषधांच्‍या किंमती या विषयावर चर्चा झाली होती. बॉलीवूड अभिनेता ‘मेडिकल माफियां’ना आव्‍हान देवू शकतो, असे रामदेवबाबांनी हा व्‍हिडिओ शेअर करता ट्‍विट केले आहे. रामदेव बाबांनी शेअर केलेल्‍या या व्‍हिडिओमुळे आयुर्वेदीक विरुद्‍ध ॲलोपॅथी हा संघर्ष आणखी वाढण्‍याची चिन्‍हे निर्माण झाली आहेत. 

अधिक वाचा : आयएमएकडून रामदेब बाबांना ओपन चॅलेंज!

कोरोना रुग्‍णांच्‍या मृत्‍यूला ॲलोपॅथी उपचार पद्‍धती व डॉक्‍टर जबाबदार असल्‍याचा आरोप करणारा योगगुरु रामदेवबाबांचा एक व्‍हिडिओ व्‍हायरल झाला होता. त्‍यांनी आपल्‍या वादग्रस्‍त विधानाबाबत १५ दिवसांमध्‍ये लेखी माफी मागावी, अन्‍यथा त्‍यांच्‍याविरोधात एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीची दावा दाखल केला जाईल, अशी नोटीस ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्‍या (आयएमए) उत्तराखंड शाखेने त्‍यांना पाठवली होती. यानंतर ॲलोपॅथी उपचार पद्‍धतीवर आक्षेप घेणार्‍या योगगुरु रामदेवबाबा यांनी खुल्‍या चर्चेत सहभागी व्‍हावे, असे आव्‍हान ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्‍या (आयएमए) उत्तराखंड शाखेने दिले होते.

अधिक वाचा : ॲलोपॅथीचे डॉक्टर राक्षसाप्रमाणे; उत्तर प्रदेशचे आमदारांनी केले बाबा रामदेव यांचे कौतुक

Back to top button