सुशीलकुमारच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ | पुढारी

सुशीलकुमारच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ

नवी दिल्ली :  पुढारी ऑनलाईन 

पैलवान सागर धनकड याच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कुस्तीपटू सुशीलकुमार याच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दोनवेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशीलकुमारने हत्येनंतर हरिद्वारला पळ काढला होता. तपासाचा भाग म्हणून दोनच दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सुशीलकुमारला हरिद्वारला नेले होते. 

गंगेत तरंगणा-या मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावा, सुप्रीम कोर्टात याचिका

ॲलोपॅथीनंतर रामदेव बाबांचा ज्‍योतिष्‍यांवर हल्‍लाबोल

Google म्हणतंय; ‘IT नियम सर्च इंजिनसाठी लागू केले जाऊ शकत नाहीत’

दिल्लीतील छत्रसाल मैदानात सुशीलकुमार व त्याच्या सहकाऱ्यांनी पैलवान सागर धनकड याची बेदम मारहाण करून हत्या केली होती. सुशील व त्याचा साथीदार अजय याला तपास कामासाठी पंजाबमधील भटिंडा तसेच चंदीगड येथेही नेण्यात आले होते. पोलिसांनी सुशीलकुमारचा शस्त्र परवानादेखील रद्द केला आहे. फरार झाल्यानंतर सुशीलकुमार पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून टेलिग्राम ऍप तसेच इंटरनेट डोंगल वापरत होता. 

फायझर, मॉडर्नाची लस लवकरच भारतात, स्‍वतंत्र चाचणी नाही 

जुलै महिन्यात ‘मेगा’ लसीकरण अभियान!

Back to top button