गुड न्यजू : देशातील कोरोनाची दुसरी लाट परतीच्या मार्गावर! | पुढारी

गुड न्यजू : देशातील कोरोनाची दुसरी लाट परतीच्या मार्गावर!

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन: मागील महिन्‍यात कहर केलेल्‍या कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागल्‍याचे चित्र आहे. मे महिन्‍यात चार ते पाच लाखांपर्यंत गेलेल्‍या रुग्‍णसंख्‍येमध्‍ये आता झपाट्याने घट होत आहे. मागील २४ तासांत १ लाख ६३६ नवे रुग्‍ण आढळले. तर २ हजार ४२७ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. १ लाख ७४ हजार ३९९ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत.नव्‍या रग्‍णसंख्‍येचेही ही आकडेवारी मागील दोन महिन्‍यातील सर्वात कमी आहे. अशी माहिती आरोग्‍य विभागाने आज दिली. 

अधिक वाचा :कोव्हीशिल्ड की कोव्हॅक्सिन? कोरोना विषाणूविरूद्ध कोणती लस अधिक प्रभावी 

कोरोनाच्‍या दुसर्‍या लाटेमध्‍ये मे महिन्‍यात कहर केला होता. मागील काही दिवस रुग्‍णसंख्‍येत घट होत असल्‍याने दिलासा मिळाला आहे. मात्र रुग्‍णांच्‍या मृत्‍यू होण्‍याचे प्रमाण कायम राहिले आहे. मागील २४ तासांत २ हजार ४२७ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे.  देशातील ३७७ जिल्‍ह्यांमधील कोरोना संसर्गाची टक्‍केवारी ५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. यामुळे काही राज्‍यांनी अनलॉक प्रक्रिया सुरु केली आहे. तर काही राज्‍यांतील जिल्‍ह्यांमध्‍ये निर्बंध कायम आहेत.

अधिक वाचा : कोरोना महरोगराईमुळे ‘सीफूड’ निर्यातीत १०.८८ टक्क्यांची घट!

देशभरात आतापर्यंत २ कोटी ८९ लाख ०९ हजार ९७५ जण कोरोनाबाधित झाले तर २ कोटी ७१ लाख ५९ हजार १८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३ लाख ४९ हजार १८६ रुग्‍णांचा बळी गेला आहे. सध्‍या १४ लाख १ हजार ६०९ रुग्‍णांवर उपचार सुरु आहेत, असेही आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी सांगितले. 

अधिक वाचा :भारताचा कोरोना लसीवर खर्च नाही तेवढा चीनचा तिबेटमध्ये खर्च! चिंता वाढवणारी काय आहे योजना?

Back to top button