ते लग्न नव्हे, लिव्ह इन रिलेशनशिप : नुसरत जहां | पुढारी

ते लग्न नव्हे, लिव्ह इन रिलेशनशिप : नुसरत जहां

कोलकाता; पुढारी ऑनलाईन: मी एका विदेशी भूमीवर अहे, त्यामुळे तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचे लग्न अमान्य आहे. दोन धर्मातील व्यक्ती लग्नबंधनात अडकणार असतील तर त्यासाठी परवानगी घेणे गरजेचे होते. लग्न वैध ठरण्‍यासाठी भारतात त्याला मान्यता मिळणे गरजेचे होते, त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नच उरत नाही. ते लग्न नव्हे, लिव्ह इन रिलेशनशिप होते, असा खुलासा तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी केला आहे.

वाचा : काँग्रेसचे नेते कमलनाथ यांची प्रकृती खालावली

नुसरत सहा महिन्यांच्या गर्भवती असून त्यांचा पती निखील जैन यांनी या मुलाचा बाप मी नाही, असे सांगून खळबळ उडवून दिली होती. गेल्या काही दिवसांपासून नुसरत एका अभिनेत्याला डेट करत असून तो भाजपशी संबधित असल्याचे बोलले जात आहे.  निखिल यांच्या वक्तव्यानंतर नुसरत यांनी खुलासा केला आहे. 

आमचे लग्न कायदेशीरदृष्ट्या वैध नाही. त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नच येत नाही, असे सांगत नुसरत यांनी निखिल यांच्यावर पैशांच्या अफरातफरीचा आरोप केला आहे. ‘स्वत:ला गर्भश्रीमंत सांगणाऱ्या निखिलने रात्रीच्यावेळी अवैधरित्या माझ्या अकाउंटमधून पैसे काढले. आम्ही दोघे वेगळे झाल्यानंतरही ते सुरुच होते.आम्ही खूप आधीच वेगळे झालो आहोत. मी माझे व्यक्तिगत आयुष्य माझ्यापुरते सीमित ठेवू इच्छित होते. मला लग्नात घरच्यांनी घातलेले वडिलोपार्जित दागिनेही त्याच्याकडे आहेत.’असेही नुसरत म्हणाल्या.

वाचा : मुंबईकरांनो सावधान! अजून मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

दरम्यान, नुसरत या सहा महिन्यांच्या गर्भवती असल्याच्या बातमीवर खुलासा करताना निखिल जैन यांनी या बाळाचा बाप मी नाही, असे सांगून खळबळ उडवून दिली होती. पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान नुसरत आणि निखिल यांच्यातील वादाच्या बातम्या येत होत्या. तसेच  बंगाली अभिनेता यश दासगुप्ता यांच्याशी त्यांचे नाव जोडले जात होते. दासगुप्ता हा भाजपशी संबधित असल्याने नुसरत जहांही भाजपमध्ये जाणार अशा अफवा उठल्या होत्या. १९ जून, २०१९ ला नुसरत आणि निखिल जैन यांचे लग्न झाले होते. तुर्कीमध्ये झालेल्या या लग्नाला जैन परिवार आणि काही मित्रही उपस्थित होते. या जोडप्याने कोलकात्यात रिस्‍पेशन आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. 

वाचा : राष्ट्रवादी युवक काँग्रेस मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एक कोटी पत्र पंतप्रधानांना पाठवणार


 

Back to top button