बीड: बेलगाव फाट्याजवळ गाडीची झाडाला धडक; २ जण जखमी

बीड: बेलगाव फाट्याजवळ गाडीची झाडाला धडक; २ जण जखमी

धोंडराई, पुढारी वृत्तसेवा: ऊमापूर – शेवगाव रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बुलोरो गाडी झाडावर आदळली. या अपघातात दोन जण जखमी झाले. ही घटना आज (दि.३) दुपारी ३ च्या सुमारास बेलगाव फाट्याजवळ घडली.

या अपघातात गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी मंगेश खरात आणि राजपिंपरी येथील ज्ञानेश्वर माने जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई येथून शेवगावकडे जात असताना बेलगाव फाट्याजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी रस्त्याच्या खाली जाऊ लागल्याने पुन्हा परत रस्त्यावर घेण्याच्या प्रयत्नात गाडी बाभळीच्या झाडावर जाऊन धडकली. शेतकऱ्यांनी गाडीतून जखमींना बाहेर काढून गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news