नितीश कुमारांनी चिराग पासवानांचा वर्षभरातच ‘काटा’ काढला! | पुढारी

नितीश कुमारांनी चिराग पासवानांचा वर्षभरातच 'काटा' काढला!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्यात बिहार निवडणुकीवेळी वितुष्ट आले होते. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी बिहार निवडणुकीवेळी नितीश कुमार यांच्या विरोधात भुमिका घेत जोरदार टीका केली होती. याचबरोबर त्यांनी नितीश कुमार यांच्या जेडीयू विरुद्ध आपले उमेदवारही उभे केले होते. यामुळे जेडीयु आणि भाजपमध्येही तणाव निर्माण झाला होता. 

वाचा : ‘एलजेपी’मध्ये उभी फुट! चिराग पासवानांविरोधात ६ पैकी ५ खासदारांकडून बंडाचा झेंडा!

पण, काही महिन्यांनी चिराग पासवान यांना त्यांच्या काकांनीच तोंडावर पाडले. या सर्व राजकीय घडामोडीपाठीमागे नितीश कुमारांचाच हात असल्याचा दावा खात्रीलायक सुत्रांनी केला आहे. 

लोक जनशक्ती पक्षाच्या सहा खासदारांपैकी पाच खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून आम्हाला एक वेगळा गट म्हणून वागणूक मिळावी अशी मागणी केली आहे. लोक जनशक्ती पक्षाचा सहावा खासदार चिराग पासवान हे स्वतः आहेत. याचबरोबर या पाच खासदारांनी आपला नेता म्हणून चिराग पासवान यांच्या ऐवजी त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांची निवड करावी अशीही मागणी केली आहे. पशुपती कुमार पारस हे स्वर्गवासी राम विलास पासवान यांचे छोटे भाऊ आहेत. 

नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाचे वरिष्ठ नेते आरसीपी सिंह यांनी सांगितले की, ‘जे तुम्ही पाहिले ते सर्वांना माहित होते. चिराग पासवान हे एनडीएमधील एका घटक पक्षाचे नेतृत्व करत होते. तरीही त्यांनी एनडीएला धक्का पोहोचेल अशी भूमिका बिहारच्या निवडणुकीत घेतली. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्यात पक्षात अस्वस्थता पसरली.’ 

लोक जनशक्ती पक्षात जी काही यादवी माजली आहे. त्यासाठी नितीश कुमार यांनी वैयक्तिक प्रत्येक खासदाराबरोबर वेगवेगळे प्लॅनिंग केले होते. त्यांनी पासवान घरातील माणूस फोडण्यासाठी जनता दल युनायडेटच्या महेश्वर हझारी यांची निवड केली होती. त्यांचे पशुपती पारस यांच्याबरोबर चांगले संबंध होते. त्यांना काका पुतण्यामधील प्रत्येक तणावाची कल्पना होती. 

वाचा : सुचेता दलालांचे एक ट्विट आणि अब्जाधीश अदानींची झोप उडाली!

पारस हे राम विलास पासवान यांचे राईट हँड म्हणून समजले जात होते. पण, राम विलास पासवान यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे पक्षातील पंख छाटण्यात आले. पारस यांचा नितीश कुमार यांना असलेला पाठिंवा कोणापासूनही लपून राहिला नव्हता. त्यांनी एनडीएमधून वेगळे होत बिहार निवडणूक लढण्याच्या चिराग पासवान यांच्या निर्णयाला मान्यता दिली नव्हती. 

दरम्यान, मुख्यमंत्री पारस यांच्या संपर्कात होते असे सुत्रांनी सांगितले. याचबरोबर दुसरे लोक जनशक्ती पक्षाच्या बंडखोर खासदार वीणा सिंह यांचा विवाह जेडीयूच्या निलंबित खासदाराबरोबर झाला आहे. ते नितीश कुमार यांच्या गुड बुक्समध्ये येणासाठी आतूर आहेत. 

वाचा :देशात उद्यापासून ‘ गोल्ड हॉलमार्किंग’ अनिवार्य

तसेच लोक जनशक्ती पक्षाचे अजून एक बंडखोर खासदार चंदन सिंह आजारी असताना नितीश कुमार हे वैयक्तीकरित्या त्यांच्या उपचावर नजर ठेवून होते. चंदन सिंह जानेवारी महिन्यात आजारी होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष दिले होते. ते खासदार बरे झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानले होते. चंदन सिंह यांचे मोठे बंधू सुरजभान हे नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या लालन सिंह यांच्या जवळचे आहेत. 

याचबरोबर नितीश कुमार यांनी चौधरी मेहबूब अली कौसर यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून राम विलास पासवान यांच्यावर दबाव आणला होता. आता नितीश कुमार यांचे ‘आभार’ मानण्याची त्यांना ही संधी मिळाली. 

तीन महिन्यापूर्वी लोक जनशक्ती पक्षाचे आमदार राज कुमार सिंह यांनी बिहार विधानसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत जेडीयुच्या महेश्वरी हझारी यांना मतदान केले होते. पक्षाच्या नेत्यांनी चिराग पासवान यांनी या धोक्याच्या इशारा समजू शकले नाहीत त्याचीच ते किंमत मोजत आहेत असे सांगितले. 

Back to top button