कोरोना : रुग्‍णसंख्‍येत वाढ, पॉझिटिव्‍हीटी दर ४.१७ वर | पुढारी

कोरोना : रुग्‍णसंख्‍येत वाढ, पॉझिटिव्‍हीटी दर ४.१७ वर

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन: कोरोनाच्‍या दुसरी लाट ओसरत असली तरी मागील २४ तासांमध्‍ये नव्‍या रुग्‍णांमध्‍ये अल्‍पवाढ झाली. ६२ हजार २२४ नवे रुग्‍ण आढळले. १ लाख ७ हजार ६२८ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. तर २ हजार ५४२ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला, अशी माहिती आरोग्‍य विभागाने आज दिली. 

अधिक वाचा : नौगाममध्ये चकमक; एक दहशतवादी ठार

कोरोनातून बरे होणार्‍या रुग्‍णांची टक्‍केवारी ९५.८० टक्‍क्‍यांवर पोहचली आहे. तर पॉझिटिव्‍हीटी दर ४.१७ टक्‍के आहे. सलग नवव्‍या दिवशी पॉझिटिव्‍हीटी दर हा पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी राहिला. दैनंदिन पॉझिटिव्‍हीटी दरही ३.२२ टक्‍के झाला आहे. मागील २४ तासांमध्‍ये देशभरात २८ लाख ४५८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 

अधिक वाचा : गौतम अदानींचे आशियातील श्रीमंतांच्या यादीतील दुसरे स्थान घसरणार?

देशभरात आतापर्यंत २ कोटी ९६ लाख ३३ हजार १०५ जण बाधित झाले तर २ कोटी ८३ लाख ८८ हजार १०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३ लाख ७९ हजार ५७३ रुग्‍णांचा बळी गेला आहे. सध्‍या ८ लाख ६५ हजार ४३२ रुग्‍णांवर उपचार सुरु आहेत, असेही आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी सांगितले. 

अधिक वाचा : घोटाळा नाहीच, हा राजकीय कट

Back to top button