कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोबाईलला रामराम; ६२ लाख ग्राहक घटले | पुढारी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोबाईलला रामराम; ६२ लाख ग्राहक घटले

मुंबई, पुढारी ऑनलाईन : कोरोना काळात माणसा माणसांत निर्माण झालेले अंतर मोबाईल ने कमी केले आहे. मात्र, याच मोबाईल च्या वापरात कोरोना काळात कमालीची घट झाल्याचे समोर आले आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) याबाबत अहवाल दिला असला तरी एका कंपनीचे नेटवर्क बंद करून दुसरी कंपनी निवडल्याचेही समोर आले आहे.

ट्राय ने दिलेल्या अहवालानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ६.२७ दशलक्ष ग्राहकांनी मोबाईल सेवा बंद केली आहे.

एअरटेल, वोडाफोन, एमटीएनएलचे ग्राहक कमी झाले असून जिओच्या ग्राहकांमध्ये मात्र वाढ झाली आहे.

मोबाईल कंपन्यांच्या मे महिन्यातील कामगिरीचा अहवाल ट्रायने नुकताच जाहीर केला. त्यानुसार देशातील ६.२७ दशलक्ष मोबाइलधारकांची संख्याकमी झाली आहे.

यात शहरी भागातील ४.१४ दशलक्ष आहेत. ही संख्या सर्वाधिक आहे. ग्रामीण भागातील २ .१४ दशलक्ष ग्राहकांनी सेवा बंद केली आहे.

एप्रिल महिन्यात देशभरात १२०३.४७ दशलक्ष मोबाईल ग्राहक होते. मे महिन्यात ही संख्या ११९८. ५० लाख इतकी नोंदविण्यात आली.

मे महिन्यात लँडलाइन ग्राहकांची संख्या मात्र वाढली आहे. या काळात १.३० दशलाख नागरिकांनी नवीन लँडलाइन कनेक्शन घेतले.

शहरी भागात १९.७० दशलक्ष आणि ग्रामीण भागात १.९६ दशलाख लँडलाइन वापरकर्ते आहेत.

जिओचा आलेख चढताच

मे महिन्यात देशभरात ६२ लाख, ७३ हजार, ८९० ग्राहकांनी मोबाईल चा वापर बंद केला आहे. त्यात भारती एअरटेलचे सर्वाधिक (४६,१३,५२१) ग्राहक कमी झाले  आहे.

व्होडाफोन आयडिया (४२,८१,५३२), बीएसएनएल (८,८०,८१०), एमटीएनएलची (२,४३६) ग्राहकसंख्या कमी झाली आहे.

मात्र, रिलाइन्स जिओच्या ग्राहकसंख्येचा आलेख चढाच असून, या महिन्यात त्यांनी ३५ लाख ५४ हजार ७२२ नवे ग्राहक जोडले आहेत.

Back to top button