नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पॉप स्टार रिहानाच्या फॅन्ससाठी गुडन्यूज आहे. पॉपस्टार रिहाना जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार झाली आहे. रिहाना ३३ वर्षांची आहे. फोर्ब्स मासिकाने बुधवारी ही यादी जारी केली आहे.
अधिक वाचा –
तिची एकूण संपत्ती १.७ मिलियन डॉलर (१२६१८.६८ कोटी) इतकी सांगण्यात आली आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, तिचा इन्कमचा प्रमुख सोर्स तिचं संगीत नाहीये. तर फेंटी ब्यूटी कॉस्मेटिक्समध्ये ५० टक्के भागीदारीने १.४ बिलियन डॉलर इन्कम आहे. त्यामुळे तिच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
अधिक वाचा –
तिच्या कमाईचा बाकी हिस्सा Savage x Fenty lingerie कंपनीतील भागीदारीतून येतो. आणि अन्य गायन आणि अभिनय क्षेत्रातून कमाई होते.
अधिक वाचा –
तिची ब्यूटी कंपनी लोकप्रिय आहे. या ब्रँडचे ५० स्किन टोनसाठी फाउंडेशन उपलब्ध आहेत.
यामध्ये डार्क शेड्स महिलांसाठी स्किन टोनच्या कलरचा समावेश आहे. हे २०१७ मध्ये लॉन्च करण्यात आले होते.
तिचे खरे नाव रॉबिन फेंटी आहे. ती लक्झरी गुड्स कंपनी LVMH सोबत पार्टनरशिपमध्ये आहे. फेंटी ब्यूटीमध्ये रिहानाची ५० टक्के भागीदारी आहे.
फोर्ब्सनुसार, रिहाना सर्वात श्रीमंत एंटरटेनरच्या लिस्टमध्ये आहे.
तिला सोशल मीडिया हँडलवरूनदेखील दमदार कमाई होते. तिची एक एक पोस्ट ट्रेंड करते. तिच्या इन्स्टावर १०१ मिलियन आणि ट्विटरवर १०२.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती सर्वात यशस्वी ब्यूटी एंटरप्रन्योर आहे.
हे देखील वाचा –
पाहा व्हिडिओ – मुंबईजवळ वसलेल्या सोंडाई गडाची सफर | The beauty of sondai fort #travelvlog