View Once नावाचं व्हाॅट्सअ‍ॅपचं भन्नाट फिचर वापरलं का? | पुढारी

View Once नावाचं व्हाॅट्सअ‍ॅपचं भन्नाट फिचर वापरलं का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज सर्वात युजर्स हा व्हाॅट्सअ‍ॅपचा आहे. त्यामुळे त्यात वेगवेगळे अपडेट येणं युजर्ससाठी पर्वणीच असते. दिवसेंदिवस व्हाॅट्सअप युजर्सना सोप्पं जाईल, अशा पद्धतीने फिचर्स अ‍ॅड करत असते. यावेळी ही व्हाॅट्सअ‍ॅपनने आपल्या युजर्ससाठी नवं फिचर अ‍ॅड केलेलं आहे. View Once असं या व्हाॅट्सअ‍ॅपच्या फिचरचं नाव आहे.

फोटो आणि व्हिडीओ यांच्यासाठी आहे. याची तुलना Disappearing फिचरशी केली जात आहे. व्हाॅट्सअ‍ॅपचं हे View Once Photos and Videos फिचर वापरणं सहजसोपं आहे. त्यासाठी वेगळी ट्रिक वापरण्याची गरजच नाही.

View Once या फिचरमधून तुम्ही फोटो किंवा व्हिडीओ पहात असाल, त्यानंतर लगेच डिलिट होईल. काही दिवसांपूर्वी असंच एक फिचर इन्स्टाग्रामने लाॅन्च केलेलं होतं. या फिचरचा मोठ्या प्रमाणात युजर्सनी वापर केलेला होता. त्यामुळे व्हाॅट्सअ‍ॅपचं हे नवं फिचर जास्तीत जास्त वापरलं जाईल, हे नक्की!
… कसं वापराल हे फिचर?
व्हाॅट्सअ‍ॅपवर आलेल्या सर्व फोटो आणि व्हिडीओसाठी हे फिचर वापरलं जाऊ शकत नाही. तुम्ही ज्या व्हिडीओ आणि फोटोसाठी हे फिचर वापराल, ते फोटो किंवा व्हिडीओ पाहिले की, लगेचच फोटो डिलीट होईल.
हे फिचर वापरण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ सिलेक्ट करावा लागेल, त्यानंतर कॅप्शन बारमध्ये ‘1’ Icon तुम्हाला दिसेल. फोटो किंवा व्हिडीओ View Once च्या माध्यमातून पाठवायचे असल्यास त्या पर्यायावर क्लिक करा.
गॅलरीत सेव्ह होणार नाहीत फोटो किंवा व्हिडीओ
View Once या फिचरच्या माध्यमातून पाठविण्यात आलेला व्हिडीओ किंवा फोटो चॅटमधून डिलिट होईल, त्याचबरोबर गॅलरीतूनही तो डिलिट होईल. अर्थात तो सेव्हच होणार नाही. इतकंच नाही, तर तो फोटो किंवा व्हिडीओ फाॅरवर्डही करता येणार नाही. विशेष म्हणजे समजा,संबंधित व्हिडीओ आणि फोटो १४ दिवसांच्या आत युजर्सने पाहिलेच नाहीत, तर चॅटमधूनदेखील डिलिट होतील.

Back to top button