नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल काँग्रेसमध्ये खलबते सुरू असून याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालची निवडणूक झाल्यानंतर आपण रणनितीकार म्हणून काम करणार नसल्याचे सांगितले होते.
२०२४ लोकसभा निवडणूक जिंकायचीच यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यासाठी आता नवी व्यूहरचना तयार केली जात आहे. २०१४ लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची असल्याने काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल होण्याची चिन्हे आहेत.
पुढील वर्षी होत असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसह २०२४ लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. काँग्रेस पक्षाने आता नवीन व्यूहरचना सुरू केली आहे.
प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान हवे आहे. किशोर यांनी पश्चिम बंगालची निवडणूक झाल्यानंतर आपण रणनितीकार म्हणून काम करणार नसल्याचे सांगितले होते.
त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
त्यानंतर २०२४ लोकसभा निवडणूक जिंकण्याबाबत काँग्रेसमध्ये जोरदार खलबते सुरू आहेत. प्रशांत किशोर यांनी काही पर्याय काँग्रेसला सूचवले असून, आगामी काळात ते सोनिया गांधी यांचे सल्लागारही असू शकतात.
काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत मोठे फेरबदल केले जाणार असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले होते.
याचबरोबर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचेही अंदाज व्यक्त केले जात आहेत. किशोर यांना काँग्रेसमध्ये निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका हवी आहे. त्यासाठी त्यांनी काही पर्याय पक्षश्रेष्ठीला सुचविले आहेत.
प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली २०२४ लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एक विशेष सल्लागार समिती तयार करण्याबाबत सूचना केली. या समितीत जास्त सदस्य नको.
ही समिती आघाडीसोबत निवडणूक प्रचार वा इतर राजकीय व्यूहरचनेबद्दल अंतिम निर्णय घेईल.
निर्णय निश्चित झाल्यानंतर अखेरच्या शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ समितीसमोर मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवत जाईल, अशी साधारण रचना असावी असे किशोर यांनी सांगितले आहे.
या समितीत प्रशांत किशोर यांना महत्त्वाचे स्थान हवे आहे. काँग्रेसमध्ये आगामी काळात मोठे बदल केले जाणार असल्याची पक्षात चर्चा सुरू झाली आहे.
पक्षात नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर नवीन समित्याही गठित केल्या जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल सोनिया गांधी चाचपणी करत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यानंतर सोनिया गांधी यांच्या राजकीय सल्लागारपदाची जबाबदारी कुणाकडेही नाही. त्यामुळे किशोर यांच्याकडे राजकीय सल्लागारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
पहा व्हिडिओ: महापुराने संसार उद्ध्वस्थ केला
https://youtu.be/nmrJVXSz3TQ