सांगली : तासगाव तहसिलदार लाचलुचपतच्या रडारवर

सांगली : तासगाव तहसिलदार लाचलुचपतच्या रडारवर
Published on
Updated on

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : तासगावच्या तहसिलदार कार्यालयातील सेवानिवृत्त लिपिक खंडू निकम मंगळवारी मध्यस्थाच्या माध्यमातून पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणात आता तहसिलदार कल्पना ढवळे सुध्दा लाचलुचपतच्या रडारवर आल्या आहेत.

मंगळवारी रात्री तासगाव येथील शासकीय विश्रामगृहात त्यांची तासभर कसून चौकशी करण्यात आली होती. आज (बुधवारी) परत एकदा त्यांना सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

आज (बुधवारी) फेरचौकशी करुन त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे, अशी माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाडगे यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news