टोकियो ऑलिम्पिकमध्ये ( Tokyo Olympic ) स्केटबोर्डिंगमध्ये आज छोट्या छोट्या मुलींनी धमाल केली. जपानच्या १२ वर्षाच्या कोकोनाने रौप्य पदक तर ग्रेट ब्रिटनच्या स्काय ब्राऊन या अवघ्या १३ वर्षाच्या मुलीने कांस्य पदक पटकावले.
ग्रेट ब्रिटनकडून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती सर्वात लहान वयाची खेळाडू ठरली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये स्केटबोर्डिंग या क्रीडा प्रकाराचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.
ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) पहिल्यांदाच समाविष्ट झालेल्या महिला स्केटबोर्डिंग स्पर्धेत अत्यंत कमी वयातील मुलींनी धुमकाकूळ घातला. साकुरा योसोझुमीने सुवर्ण पदक जिंकले. १९ वर्षाच्या या खेळाडूने ६०.०९ गुण मिळवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
त्यानंतर जपानच्याच अवघ्या १२ वर्षाच्या कोकोना हिराकीने ५९.०४ गुण मिळवत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. अवघ्या १.०५ गुणांनी तिचे सुवर्ण पदक हुकले. स्केटबोर्डिंगमध्ये जपान आपला दबदबा निर्माण केला होता. जपानचीच १५ वर्षाची मिसुगू ओकामोटो सुरुवातीला आघाडीवर होती.
ती कांस्य पदक पटकावणार असे वाटत असतानाच ती थ्री रनमध्ये पिछाडीवर पडली. अखेर तिसऱ्या प्रयत्नात ग्रेट ब्रिटनच्या स्काय ब्राऊनने ५६.४७ गुण मिळवत कांस्य पदक पटकावले. त्यामुळे जपानचा स्केटबोर्डिंगमधील तीनही पदके जिंकण्याचा मनसुबा उधळला गेला.
स्कायने स्पर्धा सुरु होण्यापूर्वी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी स्पर्धेचा आनंद घेणार आहे. माझे स्वप्न जगणार आहे. तीने साधे तंत्र अवलंबले, रोज ती जशाप्रकारे स्केट करते तसेच स्केट ती स्पर्धेतही करत होती.
ऑलिम्पिक इतिहासात सर्वात कमी वयात पदक जिंकण्याचा विक्रम हा ग्रीसच्या दिमित्रोस लाऊंड्रास याच्या नावावर आहे. त्याने १८९६ मध्ये अवघ्या १० व्या वर्षी जिमनॅस्टिकमध्ये कांस्य पदक पटकावले होते. तर मार्जोरी गस्ट्रिंग या अमेरिकन डायव्हरने १३ व्या वर्षी स्प्रिंगबोर्डमध्ये १९३६ साली सुवर्ण पदक जिंकले. तिने ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात कमी वयात सुवर्ण जिंकण्याचा विक्रम केला.
हा विक्रम यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ( Tokyo Olympic ) मोडण्यापासून थोडक्यात बचावला. जपानच्या १३ वर्षाच्या मोमिजी निशिया हिने स्ट्रीट स्केटबोर्डिंमध्ये गेल्या आठवड्यातच सुवर्ण पदक पटकावले. पण, ती गस्ट्रिंगपेक्षा दोन महिन्याने मोठी होती.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : महाराष्ट्राचे सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका
https://youtu.be/86gQicR7sfM