

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (CBSE) बारावीचा निकाल आज शुक्रवारी जाहीर केला. विद्यार्थी CBSE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in अथवा cbse.gov.in यावर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.
यंदा परीक्षा रद्द झाल्याने बोर्डाने मेरिट लिस्ट जारी केलेले नाही. टॉपर्सची देखील घोषणा केलेली नाही. ९९.६७ टक्के मुली आणि ९९.१३ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
सीबीएसई बारावी परिक्षेसाठी यंदा १३ लाख ६९ हजार ७४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील १३ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
१२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी पास झाले आहेत. तर ६५ हजार १८४ विद्यार्थ्यांच्या निकालावर प्रक्रिया सुरु आहे.
कोरोना महामारीमुळे दहावी आणि बारावी परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र देखील देण्यात आले नव्हते. मुल्यांकन फॉम्युला आधारावर निकाल तयार जाहीर करण्यात आला आहे.
सीबीएसई आणि विविध राज्यांतील शिक्षण मंडळाना ३१ जुलै २०२१ पर्यंत दहावी आणि बारावीचा निकाल लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार आज दुपारी सीबीएसईचा निकाल जाहीर करण्यात आला.
दहावी, बारावीचा निकाल लांबला होता. यामुळे विद्यार्थी, आणि पालकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर सीबीएसईने मजेशीर सूचना दिली होती. निकालाच्या आधी सीबीएसईने एक मीम शेयर केले होते. या मीमच्या माध्यमातून सीबीएसईने निकालाची सूचना दिली होती.
सीबीएसईने दिवंगत बॉलिवूड अभिनेते अमरिष पुरी आणि अभिनेत्री फरिदा जलाल यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर करत आज दुपारी 2 वाजता निकाल जाहीर होणार असल्याचे म्हटले होते.
'आखिर ओ दिन आ ही गया!' असा डायलॉगही फोटोसोबत शेअर केला आहे.
सीबीएसईने आणखी एका मीममध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील फॅमिली मॅनचा उल्लेख केला आहे. फॅमिली मॅनमध्ये मुख्य भूमिका असलेला श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी) आणि दुसरीकडे चेल्लम सर (उदय महेश) यांचे फोटो या मीममध्ये वापरण्यात आले आहेत.
हे ही वाचा :