ऑस्ट्रेलियातील आगपीडितांसाठी हॉकी इंडियाची मदत | पुढारी

ऑस्ट्रेलियातील आगपीडितांसाठी हॉकी इंडियाची मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हॉकी इंडियाने मदतीचा हात पुढे केला असून, 25 हजार अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम आगपीडितांसाठी दिली आहे. याशिवाय राष्ट्रीय संघाने आपले हस्ताक्षर असलेली जर्सीही दान केली असून, त्याच्या लिलावातून मिळणारी रक्कम सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे. ही मदत रेडक्रॉस या संस्थेमार्फत ऑस्ट्रेलियातील पीडितांना देण्यात येणार आहे. या मदतीबद्दल हॉकी ऑस्ट्रेलियाने पत्र पाठवून हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांचे आभार मानले आहेत. हॉकी इंडियाचे अध्यक्ष मेलेनी वूसनम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॅट फेविअर यांनी म्हटले आहे की, हॉकी इंडियाने केलेल्या मदतीबद्दल खूप आभार, 25 हजार डॉलर्स बरोबरच टीम इंडियाच्या जर्सीच्या लिलावातून मोठी रक्कम उपलब्ध होईल.

 

Back to top button