पंडितांच्या छळामागे मी असेन तर फाशी द्या : फारूख अब्दुल्ला | पुढारी

पंडितांच्या छळामागे मी असेन तर फाशी द्या : फारूख अब्दुल्ला

श्रीनगर ; वृत्तसंस्था : सन 1990 मधील अनन्वित छळामुळे काश्मीरमधून झालेल्या पंडितांच्या पलायनाला मी जर जबाबदार असेल तर मला फासावर चढवा, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी मंगळवारी दिली.

‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून देशभर निर्माण झालेल्या वादात फारूख यांनी पहिल्यांदाच आपले मौन सोडले. प्रत्येक काश्मिरी बांधवाला वाटते की, काश्मिरी पंडित खोर्‍यात परतले पाहिजेत. 1990 मध्ये जे काही घडले, तो एक पूर्वनियोजित कट होता. पंडितांना ठरवून लक्ष्य केले होते. तेव्हा जे दिल्लीत बसलेले होते, ते याला जबाबदार आहेत. पंडितांसाठी मीही खूप रडलो, भांडलो; पण उपयोग झाला नव्हता, असेही फारूख अब्दुल्ला म्हणाले.

काश्मीरमध्ये हिंदूंविरुद्ध हिंसाचारासाठी पोषक वातावरण फारूख अब्दुल्ला यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच तयार झाले. आयत्यावेळी जबाबदारी झटकण्यासाठी हिंदूंना वार्‍यावर सोडून फारूख अब्दुल्ला काश्मीर सोडून पळून गेले होते, असा आरोप भाजपने केला होता. त्याला वरीलप्रमाणे उत्तर फारूख अब्दुल्‍ला यांनी दिले.

Back to top button