

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : पुढील महिन्यापासून मुलांना मिळणारा कोरोना प्रतिबंधक लस भारतात उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत दिली. कोरोना प्रतिबंधक लस बाबत आरोग्य मंत्र्यांनीच माहिती दिल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिक वाचा
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. तिसर्या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक फटका बसेल, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे मुलांना लवकरात लवकर लस मिळावी, अशी मागणी सर्वच राज्यांमधून होत आहे. याबाबत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, भारत हा जगातील सर्वाधिक कोरोना प्रतिबंधक लस उत्पादक देश होण्याच्या मार्गावर आहे.
अधिक वाचा
सध्या देशात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहिम राबवले जात आहे. मुलांना लस उपलब्ध झाल्यास कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे स्पष्ट केले आहे. मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णयही घेता येणार आहे.
अधिक वाचा
मुलांसाठी लस ही सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होईल, असा विश्वास 'एम्स' प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात सध्या विविध औषध कंपन्या परीक्षण करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. केंद्र सरकारने जायडस कॅडिला कंपनीला आपत्ती काळातील लस तयार करण्यासाठी परवानगी दिली आहे.
देशात मुलांसाठीच्या लसीचे परीक्षण हे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच मुलांसाठी लस उबलब्ध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात १८ वर्षांवरील ४४ कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारने डिसेंबर २०२१पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
हेही वाचलं का?