महाराष्‍ट्रात सरकार पाडण्‍याची भाषा करणार्‍या भाजप नेत्‍यांना शुभेच्‍छा : संजय राऊत | पुढारी

महाराष्‍ट्रात सरकार पाडण्‍याची भाषा करणार्‍या भाजप नेत्‍यांना शुभेच्‍छा : संजय राऊत

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन
महाराष्‍ट्रात १० मार्चनंतर सरकार पडेल, असा दावा भाजपचे नेते करत आहेत. या सर्व नेत्‍यांना मी शुभेच्‍छा देतो, असा टोला लगावत जनतेसमोर सत्‍य मांडण्‍याचा मला अधिकार आहे. माझ्‍यावर झालेल्‍या आरोपांबाबत मी न्‍यायालयातही बोलणार आहे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज सांगितले.

माध्‍यमांशी बोलताना संजय राऊत म्‍हणाले की, “महाराष्‍ट्रामुळे कोरोना पसरला हे धांदात खोटे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्‍ट्राचा अवमान केला आहे. याविरोधात महाराष्‍ट्रातील भाजपचा एकही नेता बोलत नाही. मात्र राज्‍यातील महाविकास आघाडीचे सरकार १० मार्चनंतर कोसळले यावर हे नेते बोलत आहेत.”

महाराष्‍ट्रामुळे कोरोना पसरला, असा आरोप करताच कसा? महाराष्‍ट्राशी बदनामी कशासाठी?, असे सवाल करत महाराष्‍ट्रातमध्‍ये कोरोना मृतांचे मृतदेह नद्‍या. समुद्रात फेकले गेले नाहीत. महाराष्‍ट्राचे दमन करण्‍याचा प्रयत्‍न कराल तर तुमच्‍याविरोधात महाराष्‍ट्र एकवटेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हृदयनाथ मंगेशकर यांच्‍यावर झालेल्‍या अन्‍यायाबाबत दिलेली माहिती चुकीची आहे. असे असते तर त्‍यांनी संगीतबद्‍ध केलेले गाणी ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शनवर सर्वजण कसे ऐकत होते, त्‍यावरही बंदी आली असते, असेही ते म्‍हणाले.
आमच्‍या मागे राक्षस लावले आहेत. मात्र राक्षसाचा वध केला जातो हे स्‍वत:ला हिंदुत्‍वावादी म्‍हणणार्‍यांना चांगलेच माहित असेल. सातत्‍याने महाराष्‍ट्राशी बदनामी करायची. मुंबईचे महत्त्‍व कमी करायचे, हे उद्‍योग सुरु आहेत, असा आरोपही राऊत यांनी या वेळी केला.

हेही वाचलं का?

 

Back to top button