Hijab Controversy : मुस्लिमांनी कायद्यानुसार वागावे; मुस्लिम राष्ट्रीय मंचची भूमिका | पुढारी

Hijab Controversy : मुस्लिमांनी कायद्यानुसार वागावे; मुस्लिम राष्ट्रीय मंचची भूमिका

वाराणसी; पुढारी ऑनलाईन : सध्या कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरुन ( Hijab Controversy ) मोठेच वादंग निर्माण झाले आहे. कर्नाटकातील सरकारी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून हिजाब समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले असून कर्नाटकात अनेक ठिकाणी तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मुस्लिम मंचाची (Rashtriya Muslim Manch)  भूमिका समोर आली आहे.

कर्नाटकात निर्माण झालेल्या हिजाब ( Hijab Controversy ) वरील वादावर मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे इंद्रेश कुमार म्हणाले, देशाचे स्वत:चे कायदे आहेत. त्या कायद्यानुसारच राहिले गेले पाहिजे. प्रत्येक शाळांचे आपले एक ड्रेस कोड ओहत त्याचे पालन केले गेले पाहिजे. वाद न घालता राष्ट्रहित आणि कायद्याच्या गोष्टी मुलांना शिकवल्या गेल्या पाहिजेत.

मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे इंद्रेश कुमार पुढे म्हणाले, भारतासारखा देश संविधान आणि कायद्यांनुसार चालतो, इथे आपण ज्या संस्थांमध्ये जाता, काम करता तेथे विशिष्ट असे आचरणाचे कायदे आहेत. त्यांचे पालन करणे व त्यानुसार रहाणे गरजेचे आहे. तेव्हाच देश महान बनतो. ( Hijab Controversy )

इंद्रेश कुमार पुढे म्हणाले, इस्लाम कधीही कायदे नियम तोडण्याची परवानगी देत नाही. इस्लाममध्ये आपल्या लोकांना असे सांगण्यात आले आहे की, तुम्ही वेगवेगळ्या देशात रहणारे लोक आहात त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या देशातील कायद्यांप्रमाणे राहिले पाहिजे. आपण ज्या देशात राहता त्या देशाच्या कायद्यांचे पालन केले पाहिजे. ते पुढे म्हणाले, कायद्यानुसार रहाणे ही चांगल्या मुस्लीम व्यक्तींची लक्षणे आहेत. ( Hijab Controversy )

दरम्यान, कर्नाटकातील सरकारी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना बुरखा अर्थात हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून हिजाब समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले असून, बहुतांशी सरकारी तसेच खासगी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांत संघर्ष सुरू झाला आहे.

हिजाबला विरोध म्हणून अनेक विद्यार्थी भगवे शेले घालून कॉलेजमध्ये जात आहेत. त्यात शिमोगा जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये राष्ट्रध्वजाच्या स्तंभावर भगवा ध्वज फडकविण्यात आला, तर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत दगडफेक झाली. परिणामी हा संघर्ष आणखी चिघळू नये यासाठी बुधवार (दि.9) पासून कर्नाटकातील सर्व महाविद्यालये तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा मात्र सुरू राहतील.

दरम्यान, हिजाब घालून कॉलेजमध्ये येण्यास कॉलेज व्यवस्थापनाने बंदी घातल्यानंतर पाच विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हिजाब घालून आल्यानंतर उडपी, कुंदापूर, चिक्कमंगळूर या शहरांमधील कॉलेज व्यवस्थापनांनी या विद्यार्थिनींना कॉलेजच्या गेटवरूनच परत पाठवले. त्यानंतर त्यातील काही विद्यार्थिनींनी न्यायालयात याचिका दाखल करून हिजाब हा आमचा हक्क असल्याचा दावा केला आहे.

 

Back to top button