Union Budget 2022 :अर्थसंकल्प वाचा तुमच्या मोबाईलवर! | पुढारी

Union Budget 2022 :अर्थसंकल्प वाचा तुमच्या मोबाईलवर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कार्यकालातील चौथे आणि कोरोनाकाळातील सर्वात मोठा अर्थसंकल्प (Union Budget 2022) आज मांडणार आहेत. यंदाही हा अर्थसंकल्प पेपरलेसच असणार आहे. यंदा अर्थसंकल्पातून शिक्षण, आरोग्य क्षेत्रात महत्वाच्या घोषणा करण्यात येतील, अशी अपेक्षा आहे. हा सर्व अर्थसंकल्प तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता, वाचू शकता. कारण, केंद्र सरकारने एक अ‍ॅप लोकांसाठी उपलब्‍ध करण्यात आले आहे.

हे अ‍ॅप मागील वर्षीच लाॅंच करण्यात आले होते. त्याद्वारे खासदारांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना केंद्राचा अर्थसंकल्प अर्थात Union Budget 2022 याची सर्व कागदपत्रं पहायला मिळणार आहेत. हे अ‍ॅप Union Budget App Download तुम्हाला मिळू शकते. आज अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर मोबाईल अ‍ॅप उपलब्ध होईल. या अ‍ॅपमध्ये बजेट, भाषण, वार्षिक वित्तीय विवरण, वित्त विधेयक उपलब्ध करून दिले जाणार आहे. (Union Budget 2022)

…असे करा अ‍ॅप डाऊनलोड

हे अ‍ॅप केंद्रीय बजेट पोर्टलवर www.indiabudget.gov.in यावर डाऊनलोड करता येईल. मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. अ‍ॅप एन्ड्राॅइड किंवा आयओएस या दोन्ही प्लॅटफाॅर्मवर उपलब्ध करण्यात आलं आहे. हे अ‍ॅप https://www.indiabudget.gov.in/downloadapp.php लिंकवर क्लिक केल्यानंतर मिळू शकेल. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत आहे.

हे वाचलंत का?

Back to top button