

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : आज (दि.०१) मंगळवारी देशभरामध्ये वीज कर्मचारी खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मात्र कर्नाटक राज्यातील वीज कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे मंगळवारी कर्नाटक राज्यातील वीज कर्मचारी या आंदोलनात सहभागी न होता कामावर रुजू झाले आहेत. अशी माहिती हे स्कॉमच्या कार्यालयातून देण्यात आली. (Electricity Workers)
सोमवारी देशात खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचारी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे एक फेब्रुवारीपासून देशातील वीज कर्मचाऱ्यांनी खाजगीकरणाच्या विरोधात आंदोलन करावे अशी सूचना करण्यात आली. त्याप्रमाणे इतर राज्यातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
मात्र कर्नाटक राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय सोमवारी रात्री उशिरा घेतला. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या आंदोलनात राज्यातील वीज कर्मचारी सहभागी होणार नाहीत. (Electricity Workers)