Up Election 2022 : भाजपकडून राष्ट्रीय मुद्द्यांवर भर | पुढारी

Up Election 2022 : भाजपकडून राष्ट्रीय मुद्द्यांवर भर

लखनौ; हरिओम द्विवेदी : पश्चिम उत्तर प्रदेशात ( Up Election 2022 ) भाजपने स्थानिक मुद्दे सोडून पाकिस्तान, जिना, राममंदिर आणि बाबरी मशीद यांसारख्या राष्ट्रीय मुद्द्यांवर भर दिला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम उत्तर प्रदेशात व्हर्च्युअल रॅली काढून निवडणुकीचे बिगुल फुंकणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य भाजप नेते मुझफ्फरनगरमधील दंगलीचा मुद्दा उकरून काढत आहेत. राज्यात दंगली घडविण्यास कारणीभूत असलेल्या समाजवादी पक्षाला पुन्हा सत्तेत येऊ देऊ नका, असे आवाहनच मंत्री शहा यांनी मतदारांना केले आहे. योगी यांनी तर समाजवादी पक्षाची लाल टोपी रामभक्तांच्या रक्ताने रंगली असल्याची टीका केली आहे. भाजपच्या राजकारणावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सावध पवित्रा घेतला आहे. अखिलेश यादव यांच्याकडून भाईचारा आणि शांततेचा संदेश देऊन पश्चिम उत्तर प्रदेशातील मतदारांशी संपक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ( Up Election 2022 )

मुझफ्फरनगर दंगलीत पीडितांना आरोपी केले आणि आरोपींना पीडित. त्यामुळे दंगली करणार्‍यांना मत देण्याची चूक करू नये.
– अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव जिना यांचे उपासक आहेत तर आम्ही सरदार पटेल यांचे पुजारी आहेात.
– योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

भाजप आता घाबरली असून त्यांच्याकडून महात्मा गांधी यांच्या मारेकर्‍याचा सन्मान केला जात आहे. जनता अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
– अखिलेश यादव, सपा अध्यक्ष

आम्हाला द्वेष आणि खोटे बोलणार्‍यांचा सामना करावयाचा आहे. जिना आणि औरंगजेबाबाबत जनतेला काहीही देणे-घेणे नाही.
– जयंत चौधरी, रालोद अध्यक्ष

अधिक वाचा :

Back to top button