राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे इगतपुरी सर्किट हाऊस येथे स्वागत | पुढारी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे इगतपुरी सर्किट हाऊस येथे स्वागत

पुढारी : ऑनलाईन डेस्क : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे इगतपुरी सर्किट हाऊस येथे आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी देखील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे उपस्थित होते. इगतपुरी सर्किट हाऊस येथून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ऐ एस ऍग्री अँड अक्वा एपीपी कल्याणी वेअर हाऊस घोटी कडे मोटारीने प्रयाण केले.

राज्यपाल

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या समवेत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Back to top button