UP Assembly Election : तुम्‍ही वेळ आणि ठिकाण सांगा, आम्‍ही चर्चेला तयार : अखिलेश यादव यांचे अमित शहांना आव्‍हान | पुढारी

UP Assembly Election : तुम्‍ही वेळ आणि ठिकाण सांगा, आम्‍ही चर्चेला तयार : अखिलेश यादव यांचे अमित शहांना आव्‍हान

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
उत्तर प्रदेशमध्‍ये विधानसभा निवडणुकीची ( UP Assembly Election) रणधुमाळी जोरदार सुरु आहे. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवरील आरोप-प्रत्‍यारोपांच्‍या फैर्‍या झडत आहेत. भाजप विरुद्‍ध समाजवादी पार्टीमधील नेत्‍यांचे एकमेकांवर हल्‍लाबोल करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेले आव्‍हान समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी स्‍वीकारले असून “तुम्‍ही दिलेल्‍या प्रत्‍येक आव्‍हानांचा सामना करण्‍यास आम्‍ही तयार आहोत”, असे ट्‍विट त्‍यांनी केले आहे.

अखिलेश यादव यांनी टिवटमध्‍ये म्‍हटलं आहे की, विधासनभा निवडणुकीला सामोरे जाताना आम्‍ही सर्व प्रकारच्‍या आव्‍हानांना सामोरे जाण्‍याची तयारी केली आहे. सत्‍य हे नेहमी कोणाशीही मुकाबला करायला तयार असेत त्‍याला तयारी करण्‍याची गरज पडत नाही. तुम्‍ही वेळ आणि ठिकाण सांगा. आम्‍ही चर्चेला तयार आहोत.

UP Assembly Election : काय म्‍हणाले होते अमित शहा ?

केंद्रीय गृहंमत्री अमित शहा शनिवारी उत्तर प्रदेश दौर्‍यावर होते. मुजफ्‍फरनगर येथील मतदान संवाद कार्यक्रमावेळी त्‍यांनी अखिलेश यादव यांच्‍यावर जोरदार टीका केली होती. अखिलेश यादव यांना चुकीची माहिती देताना लाज वाटत नाही. त्‍यांनी स्‍वत:च्‍या कार्यकाळातील कायदा व सुव्‍यवस्‍थेबरोबरच गुन्‍हेगारी वाढीचे आकडे प्रसिद्‍धी माध्‍यमांना द्‍यावेत, असे आवाहन शहा म् केले होते.
योगी आदित्‍यनाथ यांच्‍या सरकारमध्‍ये विविध गुन्‍ह्यांवर वचक बसला. समाजवादी पार्टीचे नेते हे माफिया आणि गुंडांना प्रोत्‍साहन देणार आहे. मागील पाच वर्ष राज्‍यात भाजपचे सरकार आहे. या काळात कधीच पक्षाने जात, कुटुंब, माफिया आणि गुंडराज याला प्रोत्‍साहन दिले आहे. भाजप सरकारने केवळ नागरिकांची सुरक्षा आणि विकासाचीच चर्चा केली आहे, असा दावाही त्‍यांनी केला होता.

हेही वाचलं का?

Back to top button