धक्का लागल्याच्या कारणावरुन झाला होता राहुलचा खून ; पाचही आरोपींना जन्मठेप | पुढारी

धक्का लागल्याच्या कारणावरुन झाला होता राहुलचा खून ; पाचही आरोपींना जन्मठेप

सातपूर : पुढारी वृत्तसेवा : धक्का लागल्याच्या कारणावरुन युवकावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 7 डिसेंबर 2011 रोजी रात्री 10.30 च्या सुमारास त्र्यंबक रोडवरील सोनाली गार्डनसमोर आरोपींनी राहुल भास्कर शेजवळ याचा खून केला होता.

राकेश मधुकर जाधव (29), शरद ऊर्फ दिगंबर बबन नागरे (25), अनिरुद्ध धोंडू शिंदे (22), लक्ष्मण छबू गुंबाडे ऊर्फ बादशहा (26) व दीपक भास्कर भालेराव (26, सर्व रा. पिंपळगाव बहुला) अशी आरोपींची नावे आहेत. राहुल शेजवळ हा त्याच्या मित्रांसोबत जेवणासाठी सोनाली गार्डन हॉटेलमध्ये गेला होता. तेथून बाहेर आल्यानंतर धक्का लागला, अशी कुरापत काढून पाचही आरोपींनी राहुल याच्यासह त्याच्या मित्रांवर हल्ला केला. गज आणि धारदार शस्त्रांनी वार केल्याने राहुल याचा मृत्यू झाला तर त्याचे मित्र जखमी झाले होते. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक के. आर. पोपेरे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. एस. जी. कडवे यांनी युक्तिवाद केला. आरोपींविरोधात परिस्थितीजन्य पुरावे व साक्षी याच्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांनी पाचही आरोपींना खून प्रकरणी जन्मठेप व प्रत्येकी आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार डी. एस. काकड, एस. यू. गोसावी यांनी पाठपुरावा केला.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : राष्ट्रपिता म.गांधी मान्यवरांनी सांगितले एका वाक्यात | म.गांधी पुण्यतिथी विशेष

Back to top button