73rd Republic Day : का साजरा केला जातो 'प्रजासत्ताक दिन'? | पुढारी

73rd Republic Day : का साजरा केला जातो 'प्रजासत्ताक दिन'?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज २६ जानेवारी २०२२ रोजी आपण ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वत्र आनंदात हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत आहोत. याच दिवशी म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले आणि खऱ्या लोकशाहीच पर्व खऱ्या अर्थाने सुरु झाले. याची आठवण म्हणून दरवर्षी आपण २६ जानेवारी हा ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतो.

२६ जानेवारी हाच का दिवस निवडला

२६ जानेवारीलाच संविधान अंमलात आलं. २६ जानेवारी १९३० या दिवशी  लाहोर येथे  काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्याची घोषणा केली आणि आपला  तिरंगा ध्वज फडकवला. या महत्वपूर्ण दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारतीय संविधान अमंलात आणण्यासाठी निश्चित केला. आणि आपला भारत २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला.

२ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने अभ्यासपूर्ण अशी राज्यघटना  २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांत पूर्ण केली. २४ जानेवारी १९५० रोजी  हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही प्रतीवर घटना समितीच्या ३०८ सदस्यांनी स्वाक्षरी केल्या आणि ही राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण स्वीकारली. 

73rd Republic Day ७३ वा प्रजासत्ताक दिन- महाराष्ट्र चित्ररथ 

राजपथावर होणाऱ्या संचलनात  देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी झाले आहेत. आज (२६ जानेवारी) राजपथावर होणाऱ्या संचलनात राजपथावर महाराष्ट्रातील ‘जैवविविधतेचे दर्शन होत आहे. हा चित्ररथ ‘जैवविविधता मानके’ विषयावर आहे. यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’, ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखरू, विवीध अभयारण्यातील दुर्मिळ होत असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती अशी जैवविविधता दाखवणारा चित्ररथ आपल्याला राजपथावर होणाऱ्या संचलनात पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडिओ; कोल्हापुरात चिमासाहेबांनी ब्रिटिशांविरोधात विद्रोह केला होता | Battle of 1857 and chimasaheb

Back to top button