Republic Day 2022 : राजपथावर महाराष्ट्रातील जैवविविधतेचे दर्शन | पुढारी

Republic Day 2022 : राजपथावर महाराष्ट्रातील जैवविविधतेचे दर्शन

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन. देशभरात आनंदात हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्त आज राजपथावरील संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी झाले होते.

जैवविविधतेचे दर्शन देणारा चित्ररथ

राजपथावर होणाऱ्या संचलनात  देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी झाले होते. आज (२६ जानेवारी) राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्रातील ‘जैवविविधतेचे दर्शन झाले. हा चित्ररथ ‘जैवविविधता मानके’ विषयावर आहे. यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’, ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखरू, विवीध अभयारण्यातील दुर्मिळ  होत असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती अशी जैवविविधता दाखवणारा चित्ररथ आपल्याला राजपथावर संचलनात पाहायला मिळाला.

दरवर्षी राजपथावर राज्यांच्या चित्ररथांना काही नियमांनूसार संधी दिली जाते. २०१५  नूसार महाराष्ट्राला दोन वेळा सर्वोत्तम चित्ररथाचा किताब मिळाला आहे.   २०१५ साली ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर तर २०१८ साली  ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ होता.

“गोव्याच्या परंपरेची प्रतीके” संकल्पनेवर आधारित गोव्यातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये दर्शविणारा गोवा राज्याचा चित्ररथ. 

Image

नवीन सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग धोरण आणि औद्योगिक विकास धोरणावर आधारित ‘एक जिल्हा एक उत्पादन’ द्वारे कौशल्य विकास आणि रोजगाराद्वारे मिळवलेली उपलब्धी यावर आधारित उत्तर प्रदेशचा चित्ररथ.

73rd Republic Day

राफेल लढाऊ विमानातील पहिली महिला लढाऊ पायलट, फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग भारतीय हवाई दलाच्या (IAF) संचलनात.

73rd Republic Day

पंजाब राज्याचा चित्ररथ | ‘स्वातंत्र्य लढ्यात पंजाबचे योगदान’ दर्शविणारी आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्याबरोबरचं लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखालील सायमन कमिशन आणि मायकल ओडवायर यांच्यावर उधम सिंग यांनी केलेल्या निषेधाचेही चित्रण आहे.

73rd Republic Day

राजपथावरील संचलनातील क्षणचित्रे.

73rd Republic day

 

 

73rd Republic Day
जम्मू आणि काश्मीर पोलीस ASI बाबू राम यांना अशोकचक्र मरणोत्तर प्रदान करण्यात आले. बाबू राम यांच्या पत्नी रिना राणी आणि मुलगा माणिक यांनी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते सन्मान स्वीकारला.

73rd Republic Day

73rd Republic Day

परेड | पहिली तुकडी ६१ घोडदळाची आहे. ही जगातील एकमेव सेवा देणारी सक्रिय हॉर्स कॅव्हलरी रेजिमेंट आहे.

73rd Republic Day

दिल्लीतील राजपथ येथील परेडमध्ये सहभागी सेंच्युरियन टँक, PT-76, MBT अर्जुन MK-I आणि APC टोपाझच्या तुकड्या.

73rd Republic Day

73rd Republic Day

73rd Republic Day

गुजरात राज्याचा चित्ररथ ‘गुजरातच्या आदिवासी चळवळी’ या संकल्पनेवर आहे.

. 73rd Republic Day

७३ व्या प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये उत्तराखंड राज्याच्या चित्ररथात हेमकुंड साहिब गुरुद्वारा, डोबरा-चंटी ब्रिज आणि बद्रीनाथ मंदिर दाखवले आहे.

73rd Republic Day

73rd Republic Day

अरुणाचल प्रदेशचा चित्ररथ.

73rd Republic Day

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने जिंकलेल्या ७ पदकांपैकी ४ पदके हरियाणाने जिंकली. त्याचप्रमाणे पॅरालिम्पिक २०२० मध्ये देशाने जिंकलेल्या १९ पदकांपैकी ६ पदके हरियाणाच्या खेळाडूंना मिळवली. या धर्तीवर ‘खेळात प्रथम क्रमांक’ या थीमसह, हरियाणाचा चित्ररथ.

73rd Republic Day

हा  ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे लाईव्ह…

Back to top button