राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय महाअधिवेशन अमृतसरला | पुढारी

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय महाअधिवेशन अमृतसरला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दि 7 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर ,पंजाब येथे आयोजीत करण्यात आले आहे. सदर अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने नागपूर येथे रविवार दिनांक 5 मे रोजी एका बैठकीचे आयोजन धनवटे नॅशनल कॉलेजला दुपारी 12 वाजता कऱण्यात आले आहे. या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी.ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रीमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रीमिलेयरची मर्यादा 20 लाख रुपये करण्यात यावी. मंडल आयोग आणि स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या. ओबीसी प्रवर्गाचा अँट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा. इतर मागण्या मजूर करून घेण्यासाठी आणि राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या वर्षभरातील कार्यक्रम ठरविण्यासाठी ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महांघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिली.

Back to top button