नागपूर : महाराजबाग प्राणी संग्रहालयातील मादी मगरीचा मृत्यू | पुढारी

नागपूर : महाराजबाग प्राणी संग्रहालयातील मादी मगरीचा मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराजबाग प्राणी संग्रहालयातील मादी मगरीचा आज मंगळवारी दुपारी मृत्यू झाला.या मादी मगरीचा मृत्यू ह्रदयाशी संबंधित शवसनक्रिया बंद पडल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले. सदर मगर मादी पीपल्स फॉर ॲनिमल वर्धा येथून 5 ऑगस्ट 2009 रोजी महाराजबाग प्राणी संग्रहालयात आणण्यात आली. मादी मगर हे नरा सोबत जोडीने त्यांच्या पिंजऱ्यात राहत होते. सदर मगरीचे शवविच्छेदन डॉक्टर प्रशांत सोनकुसरे, विभागप्रमुख,पशुविकृतीशात्र, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, डॉक्टर रोहिणी टेंभुर्णे पशुवैद्यकीय अधिकारी, अप्पपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व नागपूर व डॉ. अभिजीत मोटघरे पशुवैद्यकीय अधिकारी महाराज बाग प्राणी संग्रहालय यांनी केले. प्राणी संग्रहालय प्रभारी अधिकारी डॉ सुनील बावसकर व इतर अधिकारांचे उपस्थितीत शव विच्छेदन नंतर परिसरात शव जाळन्यात आले.

Back to top button