देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची ठाकरेंची उंची नाही : बावनकुळे | पुढारी

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची ठाकरेंची उंची नाही : बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतील एवढी त्यांची उंची नाही. ज्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला, तेव्हाच त्यांनी हक्क गमावला. उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त होऊन असे वक्तव्य करत आहेत असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. गाव चलो अभियानातून भाजपचे 50 हजार कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या योजना केल्या त्याची माहिती देण्यासाठी गावात जाऊन मुक्काम करतो आहोत आणि त्याची माहिती पोहोचवत आहोत.आज वडोदा गावात जेवण आणि आमचा मुक्काम आहे. हे गाव स्वातंत्र्यवीरांचे गाव आहे अशी माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघांमध्ये पारडसिंगा येथे जेव्हा मुक्कामी होते, त्यांच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी झाली आणि फडणवीस यांचे स्वागत हे उबाठा गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स केलं तेव्हा त्याला काढून टाकण्यात आले. पुण्यात जी घटना घडली ती घडायला नको होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पण निखिल वागळे यांनी देखील बोलताना जरा तारतम्य बाळगावे. निखिल वागळे एकेकाळी पत्रकार होते. पण आता ते युट्युब काढून काहीही बोलत असतात. ते ऐका पक्षाचे प्रवक्ते आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मुख्यमंत्री हे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहेत यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भर दिला.

Back to top button