दहावी परिक्षेत नागपूर विभाग राज्यात नवव्या स्थानावर

दहावी परिक्षेत नागपूर विभाग राज्यात नवव्या स्थानावर

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज ( दि.२७) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. कोकण विभागाने प्रथम स्थान पटकावले. तर नागपूर विभाग ९४.७३ टक्के निकालासह राज्यात नवव्या स्थानावर आहे. गतवर्षी ९२.५ टक्के इतका निकाल होता. यंदा निकालात २.२३ टक्के वाढ झाली आहे.

विभागात ६७६ परीक्षा केंद्रावर १ लाख ५१ हजार २ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ४९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ लाख ४२ हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.७३ टक्के आहे. यापैकी ३८ हजार ५६१ विद्यार्थ्यांना डिस्टींक्शन मिळाले. तर ५५ हजार १७९ विद्यार्थ्यांना ग्रेड वन. तर ३८ हजार ७७५ विद्यार्थ्यांना ग्रेड टू मिळाले. याशिवाय पास श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ही १२ हजार ११७ इतकी आहे.

नागपूर विभागातून गोंदिया ९६.११ टक्के निकालासह प्रथम स्थानी आहे. नागपूर जिल्हा यंदा तिसऱ्या स्थानी आहे.

गोंदिया जिल्हा पुन्हा टॉप

दहावीच्या नियमित परीक्षेच्या निकालात गोंदिया जिल्ह्याने ९६.११ टäक्यासह जिल्ह्याने प्रथम स्थान पटकाविले. त्यापाठोपाठ भंडारा जिल्ह्याने ९५.४१ टक्क्यासह दुसरा तर नागपूर जिल्ह्याने ९५.०५ टक्क्यासह तिसरे स्थान पटकावले. गडचिरोली जिल्ह्याने ९४.६७ टक्क्यासह चौथे, चंद्रपूरने ९४.०५ टक्क्यासह पाचवे तर वर्धा जिल्ह्याने बारावीप्रमाणे दहावीतही ९२.०२ टक्क्यासह शेवटचे स्थान पटकावले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news