Amravati Lok Sabha : अंतर्गत विरोध डावलत भाजपकडून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी | पुढारी

Amravati Lok Sabha : अंतर्गत विरोध डावलत भाजपकडून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या वतीने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून येणे बाकी असतानाच त्यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या सातव्या यादीत अमरावतीमधून नवणीत राणा यांच्यासह कर्नाटकच्या चित्रदुर्गा लोकसभा मतदारसंघातून गोविंद करजोल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. Amravati Lok Sabha
खासदार नवनीत राणा यांना सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा कडवा विरोध राहिला आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेले प्रहारचे बच्चू कडू यांनीही राणा यांच्या उमेदवारीला प्रखर विरोधा दर्शवला होता. परंतु या सर्वांना बगल देत भाजप नेतृत्वाने नवनीत राणा यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपकडून नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे अशी लढत अमरावतीत होणार आहे. Amravati Lok Sabha
२०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी अपक्ष निवडणुक लढवत जिंकली होती. तत्कालीन एकत्र राष्ट्रवादीने त्यावेळी राणा यांना पाठिंबा दिला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ, बच्चू कडू या नेत्यांचा विरोध असतानाही नवनीत राणा लोकसभेला सामोऱ्या जाणार आहेत. मागील लोकसभेत निवडून आल्यानंतर साधारण वर्षभराने सातत्याने नवनीत राणा यांनी भाजपची बाजू उचलून धरली. या संपूर्ण पार्श्वभूमीवर भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाची घोषणा केली.
हेही वाचा 

Back to top button