नोकरीच्या मोबदल्यात शिक्षिकेचे लैंगिक शोषण; तरुणाने वारंवार केला बलात्कार | पुढारी

नोकरीच्या मोबदल्यात शिक्षिकेचे लैंगिक शोषण; तरुणाने वारंवार केला बलात्कार

‍नागपूर, पुढारी ऑनलाईन : शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी लावल्याच्या मोबदल्यात नागपुरातील एका शिक्षिकेचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. संबधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून रोशन अशोक खोडे (३८, रा. नर्मदा कॉलनी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांतून दिलेल्या माहितीनुसार ३५ वर्षीय महिला आणि संबधित युवक हे लहानपणापासून एकमेकाला ओळखतात. रोशन हा आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करतो. एक दिवस संबधित महिला लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेली असता, त्यांची भेट झाली. त्याने तिची लायसन्स काढून दिली. यावेळी दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले.

यावेळी रोशनने तिची विचारपूस केली असता आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याचे सांगितले. तसेच नोकरीची गरज असल्याचेही सांगितले.

त्यानंतर रोशनने तिला ओळखीने आश्रम शाळेत नोकरीला लावून दिले. दरम्यान दोघांचेही घरी ये-जा वाढली. रोशनने तिला नोकरी लावून दिल्याचा मोबदला म्हणून शारीरिक संबंधाची मागणी केली.

मात्र, तिने ती मागणी फेटाळून लावली. मात्र, त्याने तुला जसे नोकरीला लावले आहे तसे नोकरीवरून काढून टाकेन असे सांगत धमकी दिली. त्यामुळे तिने त्याच्या मागणीला होकार दिला. त्यानंतर दोन ते तीन वेळा त्यांच्यात शारीरिक संबंध आले. मात्र, त्यानंरही तो वारंवार मागणी करू लागला. नकार दिला असता शाळेतील नोकरी घालवण्याची धमकी देत तिला बळजबरीने लॉजवर नेत होता. शेवटी तिने कंटाळून संबंधास नकार दिला.

काही दिवसांनी रोशन हा पुन्हा शिक्षिकेच्या घरी आला आणि संबंधाची (शिक्षिकेचे लैंगिक शोषण ) मागणी करू लागला. दोघांत वाद झाला असता त्याने पतीला व मुलाला मारण्याची धमकी दिली. बळजबरीने तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. दोन दिवसांपूर्वीही संबधित शिक्षिकेने नकार दिल्याने तिला बेदम मारहाण केली. त्यामुळे तिने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरू त्याला अटक केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button